अहमदनगर, 30 डिसेंबर : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाना होताना दिसत आहे. ओमायक्रॉन (Omicron) बाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, असे असताना राजकीय नेत्यांकडूनच नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. राजकीय नेत्यांकडून मोठ्या थाटामाटात कार्यकर्माचे आयोजन होताना दिसत आहे.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे खबरदारी घेत निर्बंध लावण्यास राज्य सरकारने पुन्हा सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील बुऱ्हानगर परिसरात भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले याचा विवाह मोठ्या थाटात पार पडला आहे.
या लग्नात हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यांच्यासह विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन तसेच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे आदी उपस्थित होते.
वाचा : धोक्याची घंटा; भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत 43 टक्क्यांनी वाढ
राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असतानी अहमदनगर जिल्ह्यामध्ये माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नामध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं पहायला मिळालं. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनाही कोरोनाचा विसर पडल्याचं दिसत आहे. राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये करणच्या करुणा बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढत असताना सर्वसामान्यांना नियम दाखवणारे सरकार यावर काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल. सर्वसामान्य माणसांकडून मास्क लावले नाही म्हणून पाचशे रुपये दंड वसूल करणारे सरकारचे नियम राज्यकर्त्यांना लागू होत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यात कोरोनासह Omicron च्या रुग्णांत मोठी वाढ
राज्यात बुधवारी (29 डिसेंबर) एकाच दिवसात 85 रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 252 वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील कोरोना रुग्णाबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. बुधवारी राज्यात तब्बल 85 ओमायक्रॅान रूग्णांचे निदान झाले आहे. यामध्ये मुंबईत 34, नागपूर आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी 3 रुग्ण आढळले आहे. तर नवी मुंबई आणि पुणे पालिकेत प्रत्येकी 2 रुग्ण आढळले आहे. पनवेल, कोल्हापूर आणि बुलडाण्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यात ओमायक्रॅान रूग्णांचा आकडा आता 252 वर पोहोचला आहे.
मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ
मुंबई महापालिकेकडून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती देण्यात आली आहे. बुधवारी (29 डिसेंबर) एकाच दिवसामध्ये कोरोनाचे नवे रुग्ण 2510 आढळून आले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 2 हजार पार आल्यामुळे चिंतेत भर घातली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, BJP, Coronavirus, महाराष्ट्र