Home /News /maharashtra /

मुस्लिांना पाच टक्के आरक्षण, भीमा-कोरेगाव दंगलीत गुन्हे मागे घेणं ते 80 हजार whatsapp groups, काँग्रेसचे चिंतन शिबिरातील महत्त्वाचे ठराव

मुस्लिांना पाच टक्के आरक्षण, भीमा-कोरेगाव दंगलीत गुन्हे मागे घेणं ते 80 हजार whatsapp groups, काँग्रेसचे चिंतन शिबिरातील महत्त्वाचे ठराव

काँग्रेसचं शिर्डीत नवसंकल्प शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात महत्त्वाचे ठराव मांडण्यात आले.

    अहमदनगर, 2 जून : काँग्रेसचं (Congress) शिर्डीत नवसंकल्प शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला चिंतन शिबिर (Congress Chintan Shibir) असं म्हटलं जात होतं. या शिबिराचा आज समारोप झाला. हे शिबिर दोन दिवस चाललं. या शिबिरात काही महत्त्वाचे ठराव मांडण्यात आले. तसेच ते ठराव सर्वानुमते मंजूरही करण्यात आले. महाराष्ट्रात आगामी काळात महत्त्वाच्या शहरांच्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेसोबत (Shiv Sena) आघाडी करायची का? या विषयावरही मंथन झालं. या बैठीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'एकला चलो'ची भूमिका मांडली. पण इतर नेत्यांनी मांडलेल्या भूमिकांवरुन एकला चलोच्या भूमिकेऐवजी स्थानिक पातळीवर समविचारी पक्षाबरोबर आघाडी करण्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. असे अनेक ठराव या चिंतन शिबिरात मंजूर करण्यात आले. काँग्रेसच्या चिंतन शिबिरात कोणकोणते ठराव करण्यात आले? 1) नाना पटोलेंच्या एकला चलोच्या भूमिकेऐवजी स्थानिक पातळीवर समविचारी पक्षाबरोबर आघाडी करण्याचा ठराव 2) समविचारी पक्षांसोबत संपर्क साधून पक्षाची ताकद, क्षमता सुनिश्चित करावी. तसेच जिल्हा व ब्लॉकमध्ये पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आघाडी करण्यास पर्याय खुले असल्याचं ठरविण्यात आलं. 3) महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांबद्दल अपप्रचार खोडून काढण्याकरिता 80 हजार व्हाट्सअॅप ग्रुप तयार करणार 4) राज्यपालांच्या राजकीय भूमिकेविरोधात विधीमंडळ, न्यायालय आणि रस्त्यावरती आंदोलन करून त्यांच्या राजकीय भूमिकेचा विरोध करणार 5) प्रत्येक महाविद्यालयांमध्ये युवती काँग्रेसची स्थापना करणार 9) शाळांमध्ये जवाहर बाल मंच निर्माण करून गांधी-नेहरुंचे विचार लहानपणापासूनच मुलांवरती द्यायचा प्रयत्न केला जाणार 10) विधिमंडळात महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाची मागणी 11) भीमा-कोरेगाव दंगलीत दलित कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावेत 12) आदिवासी समाजातील महापुरुषांच्या नावे योजना सुरू करण्यात यावी 13) पाच टक्के मुस्लिम आरक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. 14) निवडणुका या ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर द्वारा घ्याव्यात, हा ठराव मंजूर करण्यात आला. 15) दर पंधरा दिवसाला मंत्री जनता दरबार घेतील. लोकहिताच्या योजनेसंदर्भात जनतेच्या प्रश्नांना उत्तर देतील. स्वतःचं खातं जनताभिमुख करण्यावर भर असेल. 16) काही मोजक्या कंपन्यांची मोनोपोली थांबवण्यासाठी अँटी ट्रस्टबाबत कायदा करावा, असा प्रस्ताव देणार
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या