मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /तिच्या आत्महत्येच्या वृत्ताने धक्का, प्रियकरानेही शेतात गळफास घेत संपवलं आयुष्य, अहमदनगरमधील घटना

तिच्या आत्महत्येच्या वृत्ताने धक्का, प्रियकरानेही शेतात गळफास घेत संपवलं आयुष्य, अहमदनगरमधील घटना

Crime News Marathi: तरुणीच्या आत्महत्येनंतर मग प्रियकरानेही घेतला गळफास आणि आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे.

Crime News Marathi: तरुणीच्या आत्महत्येनंतर मग प्रियकरानेही घेतला गळफास आणि आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे.

Crime News Marathi: तरुणीच्या आत्महत्येनंतर मग प्रियकरानेही घेतला गळफास आणि आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे.

अहमदनगर, 25 नोव्हेंबर : प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात (shocking incident of Jamkhed Taluka Ahmednagar) ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी दोघांनीही आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. (boyfriend ends life after girlfriend suicide)

दोघांनीही घेतला गळफास

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अहमदनगरमधील जामखेड तालुक्यात घडली आहे. मृतक मुलगी ही अल्पवयीन होती. मृतक मुलगा आणि मुलगी यांचे दोघांचे प्रेमसंबंध होते. अल्पवयीन मुलीने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचं वृत्त मुलाला कळताच त्यानेही शेतातीत लिंबाच्या झाडाला गळफास घेत आयुष्याचा शेवट केला.

आत्महत्येचं कारण काय?

मृतक मुलगी ही 16 वर्षांची होती तर मुलगाही 17 वर्षांचा होता. या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होतते. दोघांनीही एकाच दिवशी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, मुलीने आत्महत्या का केली याबाबत माहिती मिळू शकलेली नाहीये. पण या मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळातच मुलानेही गळफास घेत आयुष्य संपवलं.

वाचा : मुंबईत बाराव्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

आपल्या प्रेयसीच्या आत्महत्येची माहिती मुलाला मिळाली. प्रेयसीच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने मुलाने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. या घटनेनंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसेच पोलीस या प्रकरणात विविध अंगलने देखील तपास करत आहेत.

अल्पवयीन बहीण-भावावर तरुण जोडप्याचा बलात्कार

ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी विकृत घटना समोर आली आहे. कल्याण पूर्व भागात एका तरुणीने चक्क एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी तरुणी एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने पीडित मुलाच्या अल्पवयीन बहिणीवर प्रियकराद्वारे अत्याचार करण्यास भाग पाडलं आहे.

कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक आणि विकृत प्रकार घडला आहे. येथील एका 23 वर्षीय तरुणीने 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केले आहेत. ही विकृत तरुणी पीडित अल्पवयीन मुलाची नातेवाईक आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही तरुणी पीडित अल्पवयीन मुलाचं जबरदस्तीनं लैंगिक शोषण करत होती. तसेच घटनेची वाच्यता न करण्यासाठी आरोपी तरुणी अल्पवयीन पीडित मुलाला धमकावत होती. म्हणूनच गेल्या काही महिन्यांपासून पीडित मुलानं या घटनेची वाच्यता कुठेही केली नाही.

आरोपी तरुणी एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने आपल्या प्रियकराकडून पीडित अल्पवयीन मुलाच्या 16 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर देखील लैंगिक अत्याचार करायला भाग पाडलं आहे. या विकृत तरुणीच्या प्रियकराने देखील पीडित अल्पवयीन मुलीवर सातत्यानं लैंगिक अत्याचार केले आहेत.

First published:

Tags: Ahmednagar, Crime, Suicide