मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आमदारकी गेली, ग्रामपंचायत गेली आता साखर कारखानाही गेला, भाजपच्या मोठ्या नेत्याचा दारूण पराभव

आमदारकी गेली, ग्रामपंचायत गेली आता साखर कारखानाही गेला, भाजपच्या मोठ्या नेत्याचा दारूण पराभव


ग्रामपंचायतीनंतर साखर कारखान्याचीही सत्ता गमावल्याने मधुकरराव पिचड यांना मोठा धक्का बसला आहे

ग्रामपंचायतीनंतर साखर कारखान्याचीही सत्ता गमावल्याने मधुकरराव पिचड यांना मोठा धक्का बसला आहे

ग्रामपंचायतीनंतर साखर कारखान्याचीही सत्ता गमावल्याने मधुकरराव पिचड यांना मोठा धक्का बसला आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagardeole, India

अकोले, 26 सप्टेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या 28 वर्षांपासून असलेल्या सत्तेला सुरुंग लागला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पिचड यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. माजी आमदार वैभव पिचड यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे निर्वादितपणे 28 वर्षांपासून असलेल्या सत्तेपासून दूर व्हावे लागले आहे.

अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये पिचडांना मोठा धक्का बसला आहे. साखर कारखान्यातील 28 वर्षांपासूनची सत्ता गेली आहे. आमदारकी, ग्रामपंचायत आणि आता कारखाना निवडणुकीतही मधुकरराव पिचड गटाचा पराभव झाला आहे.

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत इंदोरी सर्वसाधारण उत्पादक गटाचे माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश नवले, माजी संचालकांसह अपक्ष उमेदवाराचा पराभव झाला आहे.

(बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात गोंधळ, दोन गट समोरच भिडले)

या निवडणुकीत शेतकरी समृद्धी मंडळाचे उमेदवार विद्यमान संचालक अशोक देशमुख, पाटीलबा सावंत आणि खंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, म्हाळादेवीचे माजी सरपंच प्रदीप हासे विजयी झाले आहे. एक हजार मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे. तर सोसायटी मतदारसंघाच्या निकालामध्ये उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, अकोले गटात जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कैलासराव वाकचौरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिन्नद्र धुमाळ, बुवासाहेब नवले. काँग्रेसच्या किसान सभेचे जिल्हाध्यक्ष विक्रम नवले विजयी झाले आहे.

मधुकरराव पिचड आणि मुलगा वैभव पिचड यांनाही कारखाना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 21 जागांसाठी होत असलेल्या मतमोजणीत सुरूवातीपासूनच पिचड विरोधी असलेल्या शेतकरी समृद्धी मंडळाने आघाडी घेतली आणि सर्वच जागांवर दणदणीत विजय मिळवत कारखान्यावर झेंडा फडकावला आहे.

ग्रामपंचायतीनंतर साखर कारखान्याचीही सत्ता गमावल्याने मधुकरराव पिचड यांना मोठा धक्का बसला आहे आता मार्केट कमिटी आणि दुध संघावर असलेली सत्ताही काबीज करण्याच्या विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

First published: