अहमदनगर, 20 एप्रिल : अहमदनगर (Ahmednagar ) जिल्ह्यातील अकोले (akole) तालुक्यात उत्खननात दोन हजार वर्षापूर्वीचे अवशेष सापडले आहेत. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून पुण्यातील डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी गेल्या 8 दिवसांपासून कोतूळ गावात उत्खनन करत असून आणखी संशोधन समोर येण्याची शक्यता आहे.
कळसुबाई पर्वत रांगेत वसलेल्या अकोले तालुक्यातील कोतुळ गावात पुण्यातील डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी गेल्या 8 दिवसांपासून ऐतिहासिक शोध घेत आहेत. मुळा नदीच्या किनारी असणाऱ्या या गावात आदी काळात पुरातन वसाहत असावी असा कयास होता. त्यानुसार, गेल्या 11 एप्रिलपासून डेक्कन महाविद्यालयातील विद्यार्थी अभ्यासाचा भाग म्हणून उत्खनन करत आहेत.
उत्खननात लाल काळया रंगाच्या छटा असलेली कापरे, पहिल्या शतकातील पाण्याची विहीर, धान्याचा रांजण, विश्रांतीचा ओटा, चूल, जनावरांची हाडे, सिलीकेट धातूचा काच सदृश्य निळा मणी, ताम्र धातूचे पहिल्या व दुसऱ्या शतकातील चलनी नाणे सापडले असल्याने आता कोतूळच्या उत्खननाचा इतिहास दोन हजार वर्षांपूर्वीचा म्हणजे सातवाहन काळात जाऊन पोहचला आहे. अशी माहिती डेक्कन महाविद्यालयाचे पुरातत्व विभाग प्रमुख डॉ.पी. डी. साबळे यांनी दिली.
('26 एप्रिलला माझं लग्न आहे, पळवून ने'; 10 रु.च्या नोटेवर BFसाठी GFचा मेसेज VIRAL)
उत्खननात सापडलेला सिलिकेट सदृश्य निळा मणी पहिल्या शतकातील असावा तर ताम्र धातूच्या नाण्यावरील अक्षरे नष्ट झाली असली तरी ती दोन हजार वर्षांपूर्वीची सातवाहन काळातील असण्याची शक्यता आकार व वजनावरुन स्पष्ट होते. कळसूबाईच्या पायथ्याशी सह्याद्री रांगेतील जुन्नर ते सिन्नर या व्यापारी मार्गावरील कोतूळ ही त्याकाळची अत्यंत मोठी महत्त्वाची वसाहत असल्याचं साबळे यांनी सांगितलं.
(बँकेत Fixed Deposit करण्याआधी 'या' गोष्टी लक्षात घ्या)
गेल्या अकरा तारखेपासून विद्यार्थी संशोधकांच्या दोन टीम दहा बारा दिवसांपासून हे काम करत आहेत 25 एप्रिल पर्यंत हे उत्खनन केले जाणार असून आणखी पुरातन इतिहास समोर येण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.