Home /News /maharashtra /

एकदम भारी आयडिया, खुद्द आनंद महिंद्रांनी केलं नगरच्या फेब्रिकेशनवाल्याचं कौतुक, VIDEO व्हायरल

एकदम भारी आयडिया, खुद्द आनंद महिंद्रांनी केलं नगरच्या फेब्रिकेशनवाल्याचं कौतुक, VIDEO व्हायरल

 दरबार फेब्रिकेशनने अहमदनगर शहरातील जुन्या महापालिकेच्या समोर अतिशय अरुंद गल्लीत हा फोल्डिंग जिना बनवला.

दरबार फेब्रिकेशनने अहमदनगर शहरातील जुन्या महापालिकेच्या समोर अतिशय अरुंद गल्लीत हा फोल्डिंग जिना बनवला.

दरबार फेब्रिकेशनने अहमदनगर शहरातील जुन्या महापालिकेच्या समोर अतिशय अरुंद गल्लीत हा फोल्डिंग जिना बनवला.

    अहमदनगर, 17 जुलै : प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे नेहमी आपल्या ट्वीटमुळे कायम चर्चेत असतात. आताही त्यांनी अहमनगर जिल्ह्यातल्या एका फेब्रिकेशनच्या काम करणाऱ्या कारागिरीचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून फेब्रिकेशनचं काम करणाऱ्यांचं कौतुक केलं जात आहे. अहमदनगर शहरातील दरबार फेब्रिकेशनच्या समीर बागवान,आसिफ पठाण आणि एजाज खान यांनी बनविलेल्या फोल्डिंग जिन्याचे कौतुक थेट आनंद महिंद्रा (Anand Mahindra tweet) यांनी केले आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केलंय. दरबार फेब्रिकेशनने अहमदनगर शहरातील जुन्या महापालिकेच्या समोर अतिशय अरुंद गल्लीत हा फोल्डिंग जिना बनवला. जो जिना फोल्ड करून भिंतीला लावतो येतो. त्यामुळे जेव्हा जिण्याचा वापर करायचा असेल तेंव्हाच तो जिना काढता येतो इतर वेळी तो भिंतीला लॉक करता येतो. (लोखंडी गेट अंगावर पडल्याने 7 वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू) हा जिना बनविल्यानंतर समीर बागवान यांनी त्याचा व्हिडीओ आपल्या फेसबुकवर पोस्ट केला होता. जो आनंद महिंद्रा यांनी पहिला, आणि तो व्हिडिओ त्यांनी ट्विटरवरून पोस्ट करत या कामाचे कौतुक त्यांनी केलंय. हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाख लोकांनी पाहिला आहे. तर या व्हिडिओवर पाच हजारांपेक्षा अधिक लोकांनी कमेंट केल्यात. थेट आनंद महिंद्रा यांनी आपल्या कामाचे कौतुक केल्याने आपल्याला आणखी चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे दरबार फेब्रिकेशनचे समीर बागवान यांनी म्हटलं आहे. (निया शर्मा 'अनुपमा'फेम अभिनेत्याला करतेय डेट; 'झलक दिखला जा'मध्ये दिसणार एकत्र) याआधीही सांगलीतील कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे गावचे दत्तात्रय लोहार या अवलियाने देशी जुगाड लावून थेट मिनी जिप्सी साकारली होती. रिक्षाची चाकं, हिरो होंडाचं इंजिन आणि इतर अन्य गाड्यांचे सुट्टे भाग वापरून दत्तात्रय लोहार यांनी चारचाकी गाडी तयार केली. त्यांनी या गाडीला 'जुगाड जिप्सी' असं नाव ठेवलं आहे. त्यांची ही जुगाडू जिप्सी चांगलीच व्हायरल झाली. याची भूरळ महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांना भुरुळ पडली. त्यांनी ही जिप्सी आपल्याला द्यावी, त्याबद्दल्यात नवीकोरी बोलेरो घेऊन जा अशी ऑफरच दिली होती. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळत नवी कोरी बोलेरो जीप लोहार यांना भेट दिली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या