मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अमित शहांचा ठाकरे सरकारवर निशाणा, 'हजारो कोंटींचे घोटाळे कसे झाले?, रिझर्व्ह बॅंकेने केले का ?'

अमित शहांचा ठाकरे सरकारवर निशाणा, 'हजारो कोंटींचे घोटाळे कसे झाले?, रिझर्व्ह बॅंकेने केले का ?'

Amit Shah targets Maharashtra Government : देशातील पहिली सहकार परिषद महाराष्ट्रात झाली. या सहकार परिषदेत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

तुषार रुपनवर, प्रतिनिधी

अहमदनगर, 18 डिसेंबर : अहमदगरमध्ये (Ahmednagar) देशातील पहिली सहकार परिषद पार पडली. या सहकार परिषदेत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा उपस्थित होते. या सहकार परिषदेत अमित शहा (Union Minister Amit Shah) यांनी भाषण करताना राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या सहकार परिषदेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. (Amit Shah targets opposition over corruption in district bank in maharashtra)

अमित शहा यांनी म्हटलं, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा बँकेला आयडियल मानलं जात होतं. पण आज स्थिती काय झाली आहे केवळ तीनच आहेत. काय झालं? हजारो कोंटींचे घोटाळे कसे झाले हे घोटाळे काय रिझर्व्ह बॅंकेने केले का ? तर अजिबात नाही. मी राजकीय टीप्पण्णी करण्यासाठी आलो नाहीये. मी एवढ निश्चित सांगतो कि सहकारासाठी जी काही मदत लागेल ती सर्व मदत आम्ही करणार आहोत.

मला आनंद आहे कि सर्व साखर कारखाने खाजगीकरण होत असताना प्रवरा साखर कारखाना अजूनही सहकारी तत्वावर सुरू आहे हि आमच्या सर्वांसाठी प्रेरणा आहे. मी सहकारमंत्री बनल्यावर अनेक फ्रश्न उपस्थित झाले. मी सहकारमध्ये काही तोडण्यासाठी आलेलो नाहीये तर जोडण्यासाठी आलो आहे. मात्र, राज्य सरकारनेही राजकारण बाजुला ठेवून सहकार क्षेत्राकडे पाहिलं पाहिजे असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे.

प्रवराची भूमी ही सहकार विभागासाठी काशी एवढी प्रवित्र आहे. मी सर्व फोटोच प्रदर्शन पाहील कि किती कठीण काळात हे सहकार उभ केलं. सर्वांना या जमिनीची माती कपाळावर लावायला हवी. विठ्ठलराव विखे पाटील, धनंजय गाडगीळ, वैकुंठ मेहता यांच मोठ योगदान सहकारक्षेत्रात आहे. सहकार विभागाची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर स्थापना केली, कारण सहकार विभागाची देशाला आवश्यकता आहे हे त्यांना माहीत आहे असंही अमित शहा म्हणाले.

अमित शहांनी पुढे म्हटलं, भारत सरकार एकही साखर कारखाना खाजगीकरण करू नये यासाठी तत्पर असेल. मी सहकार मंत्री झाल्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, हे सहकार तोडण्यास आले मात्र मी सांगू इच्छितो कि मी सहकार जोडण्यास आलो आहे. मला सहकार विभागाविषयी कोणीही सल्ले देण्याच काम करू नये. आम्ही बॅक वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि करत राहणार. सध्या यासंदर्भात कोणतीही समिती नेमणार नाही. आम्ही लवकरच सहकार विद्यापीठ बनवणार आहोत.

First published:

Tags: Ahmednagar, Amit Shah, महाराष्ट्र