Home /News /maharashtra /

Ahmednagar Crime: मुलाला मामाच्या घरी न पाठवल्याचा राग, जावयाला टेम्पोखाली चिरडून सासऱ्याने केलं ठार

Ahmednagar Crime: मुलाला मामाच्या घरी न पाठवल्याचा राग, जावयाला टेम्पोखाली चिरडून सासऱ्याने केलं ठार

मुलाला मामाच्या घरी न पाठवल्याचा राग, जावयाला टेम्पोखाली चिरडून सासऱ्याने केलं ठार

मुलाला मामाच्या घरी न पाठवल्याचा राग, जावयाला टेम्पोखाली चिरडून सासऱ्याने केलं ठार

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील धक्कादायक घटना घडली आहे. सासऱ्यानेच आपल्या जावयाला टेम्पोखाली चिरडले आहे.

अहमदनगर, 28 मे : सासऱ्यानेच आपल्या जावयाच्या अंगावर टेम्पो नेत त्याला चिरडून ठार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाला मामाच्या घरी पाठवत नसल्याने नसल्याचा राग आल्याने सासऱ्याने जावयाला ठार केल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात (Karjat Taluka) ही धक्कादायक घटना घडली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? कर्जत तालुक्यातील कौडणा आणि मुळेवाडी येथील दत्तात्रय जाणू मुळे हे सूद्रिक यांचे जावई आहेत. सुद्रिक हे वर्ष श्राद्धच्या कार्यक्रमला आले होते. त्यावेळी नातवाला घेण्याचा आग्रह धरला. मात्र मुलाला घेऊन जाण्यास मुळे यांनी विरोध केला. दत्तात्रय मुळे यांनी टेम्पोत बसलेल्या मुलांना उतरवण्यासाठी टेम्पो वर चढले त्यावेळेस त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. याच दरम्यान दत्तात्रय मुळे हे खाली पडले. त्यानंतर सुद्रिक यांनी टेम्पो दत्तात्रय यांच्या अंगावर घातला. त्यावेळेस मुळे हे जागीच ठार झाले. या घटनेनंतर दत्तात्रय यांचे वडील जानू मुळे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात रवींद्र बाबासाहेब सूद्रिक, बाबासाहेब दत्तात्रय सुद्रिक, नरेंद्र सदाशिव सूद्रिक, विठ्ठल सदाशिव सुद्रिक, अमोल बाबासाहेब सुद्रिक, सदाशिव दत्तात्रय सुद्रिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सासरे सुद्रिक यांच्यासह एकूण नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामावरुन काढल्याच्या रागातून मारहाण, पुण्यातील घटना पुण्यातील पिंपरी येथे एकाला मारहाणीची घटना घडली आहे. या घटनेचे कारण वाचून तुम्हाला धक्का बसेल, अशी ही घटना घडली आहे. एकाला कामावरुन काढण्यात आले होते. यानंतर ही घटना घडली. कामावरुन काढल्याच्या रागातून तरुणाला मारहाण केल्यानतंर भांडण सोडवायला आलेल्या कामगारांना धमकी देण्यात आली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी कारवाई करत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. किरण सोपान थिटे, असे मारहाणीत जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना चिंचवड येते 20 तारखेला दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अक्षय गोफणे, ओमकार गावडे दोन्ही (रा. शरदनगर, चिखली) यांच्यासह एकूण 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ahmednagar, Crime news, Murder

पुढील बातम्या