मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Ahmednagar Rain : अहमदनगरमध्ये नदीत वाहून गेलेल्या गाडीसह एक मृतदेह सापडला, एकाचा शोध सुरूच

Ahmednagar Rain : अहमदनगरमध्ये नदीत वाहून गेलेल्या गाडीसह एक मृतदेह सापडला, एकाचा शोध सुरूच

संगमनेर तालुक्यातील ओझर येथून मागच्या तीन दिवसांपूर्वी रात्री आठच्या सुमारास पिंपरने मार्गे निघालेला टेम्पो तीघांसह प्रवरा नदीत कोसळला होता.

संगमनेर तालुक्यातील ओझर येथून मागच्या तीन दिवसांपूर्वी रात्री आठच्या सुमारास पिंपरने मार्गे निघालेला टेम्पो तीघांसह प्रवरा नदीत कोसळला होता.

संगमनेर तालुक्यातील ओझर येथून मागच्या तीन दिवसांपूर्वी रात्री आठच्या सुमारास पिंपरने मार्गे निघालेला टेम्पो तीघांसह प्रवरा नदीत कोसळला होता.

  • Published by:  Sandeep Shirguppe

संगमनेर/अहमदनगर 18 ऑगस्ट : संगमनेर तालुक्यातील ओझर येथून मागच्या तीन दिवसांपूर्वी रात्री आठच्या सुमारास पिंपरने मार्गे निघालेला टेम्पो तीघांसह प्रवरा नदीत कोसळला होता. (Ahmednagar Rain) बुडालेला ‘तो’ मालवाहतूक टेम्पो अखेर प्रवरेच्या पात्राबाहेर काढण्यात आले आहे. ठाणे आपत्ती प्रशासन दलाच्या मदतीमुळे तब्बल 50 तासानंतर यश आले आहे.

स्वातंत्र्य दिनी रात्री 8 च्या सुमारास संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावाजवळ प्रवरा नदी पात्रात थेट पिकअप वाहन पडल्याची घटना घडली होती. प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले मात्र 46 तास उलटून गेल्यावर ही स्थानिक प्रशासनाला वाहन काढण्यात यश आले नाही. अखेर मुख्यमंत्री कार्यालयात ही माहिती सांगितल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनवेरून ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करण्यात आले.

हे ही वाचा : Maharashtra Rain : मुंबई, पुण्यात पावसाचा येलो अलर्ट तर विदर्भात विजांसह पावसाचा इशारा

16 हजार क्यूसेक विसर्ग सुरू असलेल्या पाण्यातून 4 तास चाललेल्या ऑपरेशन नंतर वाहन बाहेर काढण्यात काल रात्री यश आले. यामध्ये वाहन चालक प्रकाश सदावर्ते यांचा मृतदेह आढळून आला आहे. एक जण मात्र अद्यापही बेपत्ता असल्याने शोध सुरू आहे. याबात अधिकमाहिती प्रांतअधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी दिली.

राज्यातील पूर परिस्थीती गंभीर

राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 29 जिल्ह्यातील 350 गावांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये विदर्भात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Maharashtra Flood Damage) गडचिरोली, भंडारा, वर्धा जिल्ह्यात याचा मोठा फटका बसला आहे. यासाठी राज्यात 117 तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. तर 20 हजार 866 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

राज्यात मागच्या तीन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 122 नगरिकांनी आपला जीव गमावला आहे. तर 243 प्राणी दगावले आहेत. 44 घरांचे पूर्णत: तर 3 हजार 534 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. यासाठी राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

भंडारा, गोंदिया जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती व वैनगंगा नदी पातळीत झालेली वाढ याचा परिणाम भंडारा जिल्ह्यावर झाल्याने भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात एसडीआरएफचे एक पथक व स्थानिक शोध बचाव पथकामार्फत मदत कार्य सुरू आहे.

हे ही वाचा : महागाईने त्रासलेल्या जनतेला आता महावितरणाकडून शॉक; वीजदरही वाढणार? ही आहेत कारणं

गडचिरोली जिल्ह्यात गोसीखुर्द प्रकल्पाचा विसर्ग व छत्तीसगड राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रवती नदी पाणी पातळीत झालेली वाढ यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात निर्माण झालेली पूरपरिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. प्राणहिता नदी धोका पातळीच्या वर वाहत असून जिल्ह्यातील एकूण १८ रस्ते वाहतुकीकरिता बंद करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात SDRF ची ०२ पथके व स्थानिक शोध व बचाव पथकांमार्फत पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरु आहे.

First published:

Tags: Accident, Ahmednagar, Ahmednagar News, Rain fall

पुढील बातम्या