मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कर्जतमधील हिंदू तरुणावरील हल्ल्याचं नुपूर शर्मा कनेक्शन? त्या रात्री काय घडलं?

कर्जतमधील हिंदू तरुणावरील हल्ल्याचं नुपूर शर्मा कनेक्शन? त्या रात्री काय घडलं?

पीडित प्रतीक पवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. प्रतिक पवार याच्यावर एकूण 3 गुन्हे दाखल आहेत. तो रागीट स्वभावाचा आहे, विनाकारण लोकांसोबत वाद करतो आणि त्याला डॉन व्हायचं आहे.

पीडित प्रतीक पवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. प्रतिक पवार याच्यावर एकूण 3 गुन्हे दाखल आहेत. तो रागीट स्वभावाचा आहे, विनाकारण लोकांसोबत वाद करतो आणि त्याला डॉन व्हायचं आहे.

पीडित प्रतीक पवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. प्रतिक पवार याच्यावर एकूण 3 गुन्हे दाखल आहेत. तो रागीट स्वभावाचा आहे, विनाकारण लोकांसोबत वाद करतो आणि त्याला डॉन व्हायचं आहे.

  • Published by:  Kiran Pharate
अहमदनगर 07 ऑगस्ट : कर्जत तालुक्यातील तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यानुसार, नुपूर शर्माच्या स्टेटसमुळे आणि हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे हा हल्ला झाला, याबाबतचे कोणतेही पुरावे आतापर्यंतच्या तपासात समोर आलेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित प्रतीक पवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. प्रतिक पवार याच्यावर एकूण 3 गुन्हे दाखल आहेत. तो रागीट स्वभावाचा आहे, विनाकारण लोकांसोबत वाद करतो आणि त्याला डॉन व्हायचं आहे. प्रतिक पवार याच वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत भगवा झेंडा घेऊन दाखल झाला होता आणि दलितांशी वाद केला होता. 3 जुलै 2022 रोजी प्रतिक पवार याने किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून जुनैद पठाण याच्या डोक्यात वार केला होता. या घटनेनंतर कर्जत पोलिसांनी प्रतीक पवार याला अटक केली होती. प्रतिक पवारवर झालेल्या हल्ल्यामध्ये अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींमध्ये जुनैदही आहे. एसटी बसमध्ये घंटी वाजवणाऱ्या दोरीने गळफास घेऊन चालकाची आत्महत्या, धुळे आगारातली घटना त्या रात्री नेमकं काय घडलं - प्रतिक हा ४ ऑगस्ट रोजी कर्जतला परतला होता. कर्जतला परतताना प्रतिक थेट आरोपींच्या वस्तीत गेला आणि तिथे उभ्या असलेल्या मुस्लीम मुलांना चिथावणी देऊ लागला. तुला बघून घेईन, अशी धमकी दिली. मुस्लीम मुलांनी संतापून प्रतिकला काठीने मारहाण केली. आरोपींनी तलवार, कोयता, हॉकी स्टिक आणि दगड याने प्रतिकला मारहाण केल्याचं फिर्यादीने एफआयआरमध्ये लिहिलं आहे. परंतु प्रतिकला कोणत्याही धारदार वस्तूने वार झालेला नाही असं मेडिकल रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. जे सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं आहे. त्यामध्येही आरोपींच्या हातात तलवार किंवा अन्य धारदार वस्तू कुठेही दिसत नाही. पोलिसांनी आरोपीचं सोशल मीडिया प्रोफाईल तपासलं मात्र कुठेही नुपूर शर्माच्या समर्थनात केलेली पोस्ट दिसली नाही. आरोपींना याबद्दल बोलताना सांगितलं की प्रतिक अनेकदा त्यांना धमकी देत असे त्यामुळे त्याला अद्दल घडवण्यासाठी हा हल्ला केला. 'आशा होती की तो बदलेल, पण..'; इमोशनल VIDEO शेअर करत भारतीय महिलेची न्यूयॉर्कमध्ये आत्महत्या 6 आरोपींपैकी दोन आरोपी धार्मिक सलोख्यासाठी काम करतात. प्रतीक आणि आरोपी यांच्यातील भांडण नुपूर शर्मांच्या समर्थनात केलेल्या पोस्टमुळे झाल्याचा कोणताही पुरावा पोलिसांना सापडलेला नाही. ६ ऑगस्ट रोजी म्हणजेच काल, दोन आयबी अधिकारी मुंबईहून कर्जत पोलीस ठाण्यात आले होते. आयबी अधिकाऱ्यांनी आरोपींची चौकशी केली, आरोपींचे फोनही तपासले.
First published:

Tags: Crime news

पुढील बातम्या