Home /News /maharashtra /

Ahmednagar Honey trap : अहमदनगरमध्ये ब्लॅकमेलिंगचा सिलसिला, अश्लील फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, लाखोंची खंडणी

Ahmednagar Honey trap : अहमदनगरमध्ये ब्लॅकमेलिंगचा सिलसिला, अश्लील फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, लाखोंची खंडणी

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा हनी ट्रॅपचा प्रकार समोर आला आहे. एका श्रीमंत बागायतदाराकडून उसनवारी घेतलेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने बोलवत महिलेने अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढले. त्यानंतर बागायतदाराला लाखोंनी लुटत ब्लॅकमेल केलं.

पुढे वाचा ...
सुनिल दवंगे, प्रतिनिधी अहमदनगर, 11 जून : अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा हनी ट्रॅपचा (Ahmednagar Honey trap) प्रकार समोर आला आहे. एका श्रीमंत बागायतदाराकडून उसनवारी घेतलेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने बोलवत अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढण्यात आले. त्यानंतर थेट 40 लाख 50 हजारांची खंडणी (ransom) वसूल केली गेली. प्रकरण यावरच थांबले नाही तर आणखी चार लाख रुपयांची मागणी केल्याने पीडित बागायतदाराने पोलिसात धाव घेतली. शिर्डी पोलिसांनी (Shirdi Police) सापळा रचला आणि चार लाख रुपये स्वीकारताना संबधित महिलेला अटक केली. तर व्हिडीओ आणि फोटो काढणाऱ्या आरोपीला देखील पोलिसांनी अटक केली. नेमकं प्रकरण काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 साली पीडीत बागायतदाराने आरोपी अनिता गोसावी यांना काही रकम उसनवारी दिली होती. मात्र संबधित महिला उसनवारी घेतलेले पैसे देण्यास टाळाटाळ करत होती. तगादा लावल्याने अखेर एक दिवस पैसे परत करण्याच्या बहाण्याने आरोपी महिलेनं पीडीत बागायतदाराला बाभळेश्वर याठिकाणी बोलवले. रस्त्यावर पैसे कसे मोजणार म्हणून एक हॉटेलच्या रुममध्ये नेले. आरोपी महिलेने स्वतःचे वस्त्र काढून टाकले. याचवेळी पाठीमागून आलेल्या आरोपी राजेंद्र गिरी याने संबधित घटनेचे चित्रीकरण आणि छायाचित्र काढले. त्यानंतर दोघांनी मिळून पीडित व्यक्तीकडे रकमेची मागणी करण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाही तर संबंधित व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. पीडित व्यक्तीने अब्रूला घाबरत सुरुवातील 40 लाख 50 हजार रुपये दिले. मात्र त्यानंतर देखील ब्लॅकमेलिंगचा सिलसिला सुरुच राहीला. (महाराष्ट्रातील 'या' भागात पुढचे 5 दिवस मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट) आरोपी महिलेने चार लाख रुपयांची आणखी मागणी केल्याने पीडित बागायतदाराने पोलिसात धाव घेतली. तिथे त्याने सर्व प्रकार सांगत तक्रार अर्ज दाखल केला. शिर्डी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत खात्री करण्यासाठी प्री ट्रॅप पंचनामा तयार केला. पन्नास हजार रुपयांच्या खऱ्या नोटा आणि बंडलच्या खाली साधे कागद असे चार लाख रुपये तयार केले. शिर्डीतील हॉस्पिटल रोडवर पैसे घेण्यासाठी महिलेला बोलावलं. संबंधित महिला घटनास्थळी आली तेव्हा ट्रॅप लावून पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडलं. शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटल येथील रोडच्या कडेला पोलिसांनी सापळा रचला. तसेच फिर्यादी चार लाख रुपये घेवून त्याठिकाणी पोहचला. महिलेन ते सर्व पैसे ताब्यात घेत आखणी 40 लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले तर हे सर्व प्रकरण मिटेल आणि व्हिडिओ आणि फोटो परत करु, असे म्हटले. त्याचवेळी पोलिसांनी आरोपी महिलेस सरकारी पंचासमोर ताब्यात घेतले. तर त्यानंतर शोधाशोध करुन दुसरा आरोपी राजेंद्र गिरी याला देखील अटक करण्यात आली. आरोपींची पार्श्वभूमी आरोपी महिला अनिता गोसावी आणि तिचा सहकारी राजेंद्र गिरी हे दोघेही मित्र आहेत. महिला संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी तर तिचा मित्र गिरी हा लोणी येथील रहिवाशी आहे. दोघेही सोबत राहत होते. त्यातच त्यांनी नातेसंबंध जोडत आता व्याहीदेखील झाले आहेत. दोघांनी मिळून फिर्यादीकडून सुरुवातील 40 लाख 50 हजारांची खंडणी स्वरुपात वसूल केले. त्यानंतर चार लाख रुपये स्वीकारताना आणखी 40 लाखांची मागणी केली. यावेळी तक्रारदाराने पोलिसांची मदत घेत या जोडप्याचा भांडाफोड केला. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षण गुलाबराव पाटील यांनी यावेळी इतर नागरिकांना देखील आवाहन केले. अशाप्रकारे कुणाला ब्लॅकमेल केले असेल तर पुढे येवून गुन्हा दाखल करा. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्याचे अश्वासन यावेळी दिले आहे. हे दोन्ही आरोपी विरोधात भादवि 384 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सबळ पुरावे पोलिसांकडे आहेत. त्याआधारे दोन्ही आरोपींना 13 जूनपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. हनी ट्रॅप गुप्त माहिती काढण्यासाठी किंवा पैसे उकळण्यासाठी महिलांचा वापर करुन त्याला आपल्या जाळ्यात ओढायचे याला सर्व साधारणपणे हनी ट्रॅप म्हटले जाते. या पद्धतीला जगभरात सर्वत्र हजारो वर्षांचा इतिहास आहे. अलिकडे अशा घटनेत वाढ होताना दिसून येत आहे. मोबाईलमध्ये झटपट व्हिडीओ रेकॉर्डींग करुन सोशल मीडीयात व्हायरल करणं सहज शक्य असल्याने अशा घटना घडताना दिसतात.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या