मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अहमदनगरमध्ये Corona Virus चा उद्रेक, तीन दिवसात 52 विद्यार्थी पॉझिटिव्ह

अहमदनगरमध्ये Corona Virus चा उद्रेक, तीन दिवसात 52 विद्यार्थी पॉझिटिव्ह

कोरोना व्हायरसचा (corona virus) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉननं (Omicron) सर्वांचीच चिंता वाढवली आहे.

कोरोना व्हायरसचा (corona virus) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉननं (Omicron) सर्वांचीच चिंता वाढवली आहे.

कोरोना व्हायरसचा (corona virus) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉननं (Omicron) सर्वांचीच चिंता वाढवली आहे.

अहमदनगर, 26 डिसेंबर: कोरोना व्हायरसचा (corona virus) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉननं (Omicron) सर्वांचीच चिंता वाढवली आहे. या व्हेरिएंटमुळे (new variant) भीतीचं वातावरण पसरलं आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra) या व्हेरिएंटचा फैलाव होत असल्याचं दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेले कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. आताच समोर आलेल्या माहितीनुसार, अहमदनगरमध्ये (Ahmednagar) पुन्हा एकदा 52 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात आणखी 52 विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले आज दुपारी विद्यालयाला भेट दिली आहे.

हेही वाचा- 'या' छोट्याशा घराची किंमत कोटींच्या घरात; फक्त बाथरूम पाहून खरेदीसाठी तयार 

तीन दिवसांपूर्वी या विद्यालयात 16 विद्यार्थी, दोन शिक्षक, सफाई कर्मचारी, असे 19 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले होते. त्यानंतर संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शाळेतील 385 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात आणखी 52 विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाची निदान झाले.

जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावात असलेली निवासी शाळा ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवोदय विद्यालय नेटवर्कचा भाग आहे. शाळेत 5वी ते 12वी पर्यंत वर्ग असून 400 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याचंही सांगण्यात येत आहे.

First published:

Tags: Ahmednagar News, Corona virus in india, Coronavirus