मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जमिनीच्या वादातून सैनिकाच्या घरावर जमावाचा हल्ला, अहमदनगरमधील भयावह घटना

जमिनीच्या वादातून सैनिकाच्या घरावर जमावाचा हल्ला, अहमदनगरमधील भयावह घटना

नगरमध्ये जमावाचा जवानावर हल्ला

नगरमध्ये जमावाचा जवानावर हल्ला

अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानाच्या घरावर गावगुंडांनी प्राणघात हल्ला केल्याची घटना घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ahmadnagar, India

साहेबराव कोकणे, प्रतिनिधी

अहमदनगर, 25 मे : अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानाच्या घरावर गावगुंडांनी प्राणघात हल्ला केल्याची घटना घडली आहे. गावगुंडांनी जवानाला आणि त्याच्या कुटुंबीयांना लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर तालुक्यातील जेऊर वाघवाडी येथील राजस्थान बिकानेर 66 मधील तोफखाना युनिटवर कार्यरत असलेल्या सैनिक महेश गोरक्ष वाघ यांच्यावर हा हल्ला झाला आहे. गावातील गुंडांनी हल्ला केला असून महेश वाघ हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे महेश वाघ यांनी सांगितलं. वडिलोपार्जित 79 गुंठे जागा ही महेश वाघ यांच्या वडिलांच्या नावाने आहे. सदरचा इसम त्रास देतो म्हणून महेशच्या वडिलांनी या जमिनीतून 45 पॉईंट 15 फूट जागा त्याच्या नावाने करून दिली. मात्र जमीन देऊन सुद्धा त्या इसमाने 3 गुंठ्यावर अतिक्रमण केले आहे. याचा जाब विचारण्यासाठी गेले असता, उलट त्याच्यावरच गावगुंडांनी हल्ला केला.

विशेष म्हणजे महेश वाघ यांनी पोलिसांना फोन केला होता. 'आमच्या जमिनीवर काही काही लोक बळजबरीने घर बांधत असून ते माझ्यावर हल्ला करण्यासाठी येणार आहेत. तुम्ही पोलीस पाठवा असा फोनही एमआयडीसी पोलीस स्टेशनला केला होता. मात्र पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल करावी, असं सांगितलं. पण, त्याआधीच महेश वाघ यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. लाठ्या काठ्याने वाघ यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 326 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

First published:
top videos