मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गणेश विसर्जनातही रंगला शिंदे-ठाकरे वाद; अहमदनगरमध्ये मिरवणूक थांबवण्याची आली वेळ

गणेश विसर्जनातही रंगला शिंदे-ठाकरे वाद; अहमदनगरमध्ये मिरवणूक थांबवण्याची आली वेळ

Uddhav Thackeray-Eknath Shinde

Uddhav Thackeray-Eknath Shinde

शेवटी पोलिसांना यात मध्यस्थी करावी लागली.

  • Published by:  Meenal Gangurde
अहमदनगर, 9 सप्टेंबर : अहमदनगर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिंदे गटाचा डीजे हा शिवसेना- ठाकरे गटाच्या पुढे घेतल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. अहमदनगरमधील परंपरेनुसार शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मिरवणुकीत 14 वा क्रमांक असतो. त्याजागी शिवसेनेच्या शिंदे गटाचा डीजे पुढे घेतल्याने ठाकरे गट आक्रमक झाला होता. त्यामुळे ठाकरे गटाकडून जागेवरच मिरवणूक थांबवण्याचा इशारा देण्यात आला होता. पोलीस प्रशासनाकडून चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. जर नवीन मंडळाना मिरवणुकीत सहभागी व्हायचे असेल तर परंपरेनुसार ठरवून दिलेल्या क्रमांकाच्या मागे मिरवणुकीत सहभागी व्हावे, यावर ठाकरे गट ठाम होता. मिशन 2024 : भाजपकडून महाराष्ट्रातील चार नेत्यांवर मोठी जबाबदारी! तावडेंचं प्रमोशन तर मुंडेंच.. अखेर ठाकरे गटाचा डीजे मिरवणुकीत पुढे घेण्यात आला आणि मिरवणूक सुरळीत सुरू झाली. शिंदे गटाकडून रीतसर मिरवणुकीसाठी परवानगी मागण्यासाठी अर्ज करण्यात आल्याने पोलीस प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र पोलीस प्रशासनाने योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत मिरवणूक पुन्हा सुरू केली.
First published:

Tags: Cm eknath shinde, Uddhav Thackeray (Politician)

पुढील बातम्या