मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Ahmednagar: हंडाभर पाण्यासाठी शेतकऱ्याचा घेतला जीव, कुऱ्हाडीने घाव घालत पाडलं रक्ताच्या थारोळ्यात

Ahmednagar: हंडाभर पाण्यासाठी शेतकऱ्याचा घेतला जीव, कुऱ्हाडीने घाव घालत पाडलं रक्ताच्या थारोळ्यात

Murder in Ahmednagar: पाथर्डी तालुक्यातील वडगाव याठिकाणी एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या (Farmer brutal murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं कुऱ्हाडीने वार (Attack with axe) करून शेतकऱ्याचा जीव घेतला आहे.

  • Published by:  News18 Desk

अहमदनगर, 29 डिसेंबर: पाथर्डी तालुक्यातील वडगाव याठिकाणी एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या (Farmer brutal murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. सामूहिक विहिरीतून पाणी घेण्यावरून वाद (Dispute over water) झाल्यानंतर, एका तरुणाने धारदार कुऱ्हाडीने वार (Attack with axe) करून एका शेतकऱ्याची हत्या केली आहे. यानंतर आरोपीनं संबंधित शेतकऱ्याचा मृतदेह विहिरीत टाकून घटनास्थळावरून पळ काढला आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून पुढील तपास केला जात आहे.

भागवत मारुती गर्जे असं हत्या झालेल्या शेतकऱ्याचं नाव असून तो पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी आहेत. तर  भागवत ऊर्फ मिठू भगवान बडे असं आरोपीचं नाव असून तोही वडगावातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिण्याच्या पाण्यासाठी वडगावात एक सार्वजनिक विहिर आहे. गावातील सर्वजण याचं विहिरीतून पिण्यासाठी पाणी घेऊन जातात.

हेही वाचा-शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल; खोल दरीत आढळला मृतदेह

पण गेल्या आठ दिवसांपासून संबंधित विहिरीवरील पंपाला वीजपुरवठा करणारं रोहित्र खराब झालं होतं. रोहित्र खराब झाल्याने गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. सोमवारी विहिरीवरील पंपाचं रोहित्र दुरुस्त करण्यात आलं त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत झाला. पण वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर सर्वप्रथम पाणी कुणी घ्यायचं, यावरून मृत गर्जे आणि आरोपी बडे यांच्यात वाद झाला. बाचाबाचीपासून सुरू झालेला हा वाद काही वेळातच विकोपाला गेला.

हेही वाचा-NCP नगरसेवकाच्या मुलाचा विवाहितेवर बलात्कार; जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार

यावेळी संतापलेल्या भागवत बडे याने मृत भागवत गर्जे यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, भागवत गर्जे हे घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. यानंतर आरोपी बडे याने भागवत यांचा मृतदेह विहिरीत टाकून घटनास्थळावरून पळ काढला. संजय विठ्ठल गर्जे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भागवत ऊर्फ मिठू भगवान बडे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Ahmednagar, Crime news, Murder