Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लेकाचा अपघातात मृत्यू, वृत्त समजताच आईनंही सोडला जीव, नगरमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना

लेकाचा अपघातात मृत्यू, वृत्त समजताच आईनंही सोडला जीव, नगरमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे एका मुलाचा अपघाती मृत्यू (Death in accident) झाल्याची माहिती कळताच, आईचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला (Death by heart attack) आहे.

  • Published by:  News18 Desk

अहमदनगर, 31 डिसेंबर: आई आणि बाळाचं नातं हे जगातील सर्वात मजबूत नातं असतं. आपल्या मुलावर एखादं संकट आलं तर आई स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचं रक्षण करते. मुलाला साधी ठेचही लागली तरी आईचं मन कासावीस होतं. अशात आई आणि मुलाच्या अतूट नात्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील प्रवरानगर येथे एका मुलाचा अपघाती मृत्यू (son dead in road accident) झाल्याची माहिती कळताच, आईचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला (mother died by heart attack) आहे.

अवघ्या काही तासांच्या अंतराने अशाप्रकारे मायलेकाचा मृत्यू (Son and mother died on same day) झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजेंद्र दत्तात्रय गागरे असं अपघातात मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर नलिनी दत्तात्रय गागरे असं हृदयविकाराच्या झटक्याने गतप्राण झालेल्या आईचं नाव आहे. मृत राजेंद्र हा  एलआयसी एजंट म्हणून काम करतो, तर त्याची आई या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहे.

हेही वाचा- अल्पवयीन मुलीसोबत क्रूरतेचा कळस, बलात्कारानंतर चिमुकलीची पिरगळली मान, महाराष्ट्राला हादरवणारी घटना

घटनेच्या दिवशी मृत राजेंद्र हा लोणीहून आपल्या घरी दुचाकीने जात होता. दरम्यान राहाता तालुक्यातील लोणी-कोल्हार रस्त्यावरून जात असताना, राजेंद्रच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की राजेंद्रचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तसेच पोलिसांनी अपघाताची माहिती राजेंद्र यांच्या कुटुंबीयांना कळवली.

हेही वाचा-नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा, पत्रकार बनून सैनिकास लुबाडलं, कृत्य वाचून हादराल

मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, आई नलिनी दत्तात्रय गागोरे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना देखील यश आलं नाही. मुलाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच आईनं देखील अखेरचा श्वास सोडला आहे. एकाच दिवशी मायलेकाचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने गावात शोककळा पसरली होती. कुटुंबीयांनी दोघांवर एकत्रित अंत्यसंस्कार केले आहेत.

First published:

Tags: Ahmednagar, Crime news