अहमदनगर , 6 फेब्रुवारी : पुण्यानंतर आता कोयता गँगचं लोण अहमदनगरमध्ये देखील पसरल्याचं पहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सुप्यात कोयता गँगने पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कोयता गँग सक्रिय झाल्यानं एमआयडीसी भागात भीतीचं वातावरण आहे. कोयता गँगमधील मुख्य आरोपी कैफ मन्यार याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्याला रांजणगाव गणपती येथून अटक करण्यात आली आहे. त्याला रात्री सुपा पोलीस स्टेशनला हजर करण्यात आलं.
व्हिडीओ व्हायरल
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोयता गँग सक्रिय झाली असून, कोयता गॅंगच्या दहशतीचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तरुणाचं एक टोळक एका तरुणाला मारहाण करताना दिसत आहे. त्यांच्या हातात काठ्या आणि कोयता आहे. हा सर्व प्रकार एका दुकानासमोर झाला असून, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पुण्यानंतर आता कोयता गँगचं लोण अहमदनगरमध्ये देखील पसरल्याचं पहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सुप्यात कोयता गँगने पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. pic.twitter.com/Oko84Ujorj
— News18Lokmat (@News18lokmat) February 6, 2023
पुण्यातही दहशत
पुण्यातही कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. कोयता गॅंगमध्ये अनेक अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी अशा घटना घडतच आहेत. आता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अनोखी युक्ती शोधली असून, इथून पुढे पुण्यात कोयता खरेदी करण्यापूर्वी आधार कार्ड द्यावे लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Ahmednagar News, Crime, Crime news