Home /News /maharashtra /

4 वर्षांच्या चिमुरड्यासोबत केले अनैसर्गिक कृत्य, जमावाने नराधमाला बेदम चोपले अन् गेला जीव, VIDEO

4 वर्षांच्या चिमुरड्यासोबत केले अनैसर्गिक कृत्य, जमावाने नराधमाला बेदम चोपले अन् गेला जीव, VIDEO

उपस्थित जमावाने आरोपी राजेश सोनार याला बेदम मारहाण केली, त्यात आरोपीचा मृत्यू झाला

उपस्थित जमावाने आरोपी राजेश सोनार याला बेदम मारहाण केली, त्यात आरोपीचा मृत्यू झाला

उपस्थित जमावाने आरोपी राजेश सोनार याला बेदम मारहाण केली, त्यात आरोपीचा मृत्यू झाला

    सुनिल दवंगे, प्रतिनिधी अहमदनगर, 09 जून : अहमदनगरमध्ये 4 वर्षांच्या चिमुरड्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीला उपस्थित जमावाने ठार मारले, विशेष म्हणजे, या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र नायर, अजहर शेख, सिकंदर शाह, सोमनाथ गायकवाड या आरोपींना पोलिसांनी 302 अन्वये अटक केली आहे. राजेश सोनार नावाच्या व्यक्तीने 4 वर्षाच्या चिमुरड्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. चार दिवसांपूर्वी ही घटना समोर आली होती. ही घटना तेव्हा उघड झाली जेव्हा मुल घरात मिळून आले नाही. शोधाशोध केली असता राजेश सोनार याच्या घरातून मुलाचा रडण्याचा आवाज येवू लागला. तेव्हा मुलाच्या आईने मुलाला बाहेर काढले आणि त्याला खाजगी रुग्णालयात नेले. त्यावेळी त्यांना आपल्या मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य झाल्याचे समजले. यानंतर त्यांनी तोफखान पोलिसात राजेश सोनार याच्या विरोधात पोलिसात धाव घेतली. पेलिसांनी संबधित प्रकार बघून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. राजेश सोनार हा आणि तक्रारदार एकाच गल्ली राहत होते. संबधित प्रकार गंभीर असल्यामुळे राजेश सोनार याला उपस्थित चार जणांनी मारहाण केली. आरोपी मयत राजेश सोनार हा जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले. चार दिवस त्याचावर उपचार सुरू होते. दरम्यान बुधवारी उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (विमानाच्या पायऱ्या चढताना पाय घसरला अन्..; अमेरिकेच्या अध्यक्षांचे फोटो Viral) पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी या घटनेची दखल घेत व्हायरल व्हिडीओ मयत आरोपीस मारहाण करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. पोलीस असो किंवा सामान्य नागरिक कोणाला ही कायदा हातात घेण्याचा आधिकार नाही. आरोपी असेल तर त्याला शिक्षा देणाचा अधिकार न्यायालयाला आहे. सदर घटनेतील आरोपीने अत्यंत घृणास्पद गुन्हा केला होता. त्याच्या रिअक्शनमध्ये त्याला मारहाण करण्यात आली होती. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला असून मारहाण करणाऱ्यांविरोधात भादवि 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे एसपी मनोज पाटील यांनी स्पष्ट केले आहे. उपस्थित जमावाने आरोपी राजेश सोनार याला बेदम मारहाण केली, त्यात आरोपीचा मृत्यू झाला. तसेच मारहाणीचा व्हिडिओ बुधवारी रात्री समोर आला. यानंतर तोफखाना पोलिसांनी त्याची हत्या करणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या