अहमदनगर, 26 जानेवारी : जिद्द चिकाटी आणि नवीन काही तरी करण्याची धडपड असेल तर केलेल्या प्रयत्नांना यश मिळते. नगर जिल्ह्यातील इयत्ता आठवीत शिकत असलेल्या सोहम शेणकर या विद्यार्थ्याने बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक कारचे मॉडेल बनविले आहे. विशेष म्हणजे सोहमने प्लंबींगच्या साहित्याच्या उपयोग करून ही भन्नाट गाडी बनविली आहे. एका चार्जमध्ये ही गाडी 22 किलोमीटर एवढी धावते.
देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढते आहे. अशात सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर सबसिडीही देते आहे. नवीन वाहन खरेदी करणारे लोक आपल्या गरजेनुसार, इलेक्ट्रिक वाहनाची खरेदी करत आहेत. अशात सोहमने बनविलेली कार फायद्याची ठरू शकते.
ग्रामीण भागातील मुलं देखील तंत्र क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात. त्यांच्या मध्येही टॅलेंट असून सोहम शेणकर हे एक उदाहरण आहे. सोहमने संशोधन व कल्पकता याची योग्य सांगड घालून इलेक्ट्रिक कार बनविली आहे. सोहम सध्या अभिनव पब्लिक स्कूलला 8 वीच्या वर्गामध्ये शिकत आहे. सोहमची संशोधक म्हणून चौथीपासून सुरूवात झालेली आहे. चौथीत त्याने रिमोट कंट्रोलवर चालणारा ट्रॅक्टर बनवला होता.
एका चार्जमध्ये 22 किमी प्रवास
सोहमने इंटरनेटची मदत घेत गाडी बनवली आहे. बॅटरी एकदा फूल चार्ज केली की ती 20-22 किलोमीटर जाते. कारला 20 चा स्पीड आहे. ही इलेक्ट्रिक कार 80-100 किलो एवढं वजन पेलवू शकते. या कारमध्ये सोलर पॅनल तयार करण्यात आलेले आहे म्हणून सूर्य किरणावर बॅटरी चार्ज होऊ शकते.
Solapur : शिपायाच्या मुलीनं घडवला इतिहास, पहिल्याच प्रयत्नात झाली न्यायाधीश!
इंजिनिअर बनण्याचे स्वप्न
सोहमचे पुढील स्वप्न आर्किटेक्ट अथवा इंजिनिअर व्हायचे, सोहमचे वडील नोकरी करतात तर आई गृहिणी आहे. एकत्र कुटुंबात सोहमचे संगोपन होत आहे. सोहमने हे संशोधन स्वतः केलं आहे. यासाठी त्याला त्याच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. भविष्यामध्ये दिवाळीच्या काळामध्ये लोखंडी पत्र्याची मोटारगाडी बनविण्याचा त्याचा मानस आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Local18