मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : 67 वर्षांच्या आजींचा कडक चहा, आरोग्यालाही आहेत अनेक फायदे

Video : 67 वर्षांच्या आजींचा कडक चहा, आरोग्यालाही आहेत अनेक फायदे

X
चहा

चहा हा कडक असावा असे आपण अनेकदा म्हणतो. असाच कडक आणि आरोग्यदायी चहा कुठे मिळत असले तर भारीच.

चहा हा कडक असावा असे आपण अनेकदा म्हणतो. असाच कडक आणि आरोग्यदायी चहा कुठे मिळत असले तर भारीच.

  • Local18
  • Last Updated :
  • Ahmednagar, India

    अहमदनगर, 22 डिसेंबर : चहा एक असे पेय आहे जे प्रत्येक वयोगटातील आणि प्रत्येक वर्गातील लोकांना आवडते. चहावरील लोकांचे प्रेम पाहता चहाचे अनेक प्रकार देखील उपलब्ध झाले आहेत. चहा हा कडक असावा असे आपण अनेकदा म्हणतो. असाच कडक आणि आरोग्यदायी चहा कुठे मिळत असले तर भारीच. नगरच्या न्याय भवन समोर एका आजींचे चहा सेंटर आहे. येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आणि गुणकारी चहा मिळतील. किती प्रकारचे आहेत चहा आणि काय आहे खास पाहुयात.

    नगर शहरातील सिद्धार्थ नगर भागात राहणाऱ्या 67 वर्षीय बाळूबाई गायकवाड या आजीबाईंनी चहाचे हॉटेल सुरू केलं आहे. अनेक वर्ष लोकांकडे वेगवेगळ्या पद्धतीचे काम केल्यानंतर या आजींनी हे हॉटेल भारलं आहे. यापूर्वी आजीबाई धुणी भाड्यांचे काम करायच्या. आयुष्यात अनेक कष्टाचे कामं केलेल्या आजींच्या मनात काहीतरी नवीन करायचं होते. यात काय करावं, असा प्रश्न असताना आजींच्या नातवांनी सांगितले की, आजी तू चहा चांगला बनवले चहाच हॉटेल सुरू कर.

    न्यू इयर पार्टीला घरी करा खानदेशी भरीत, पाहा Recipe Video

    आरोग्यदायी चहा

    वयाच्या 67व्या वर्षी आजीने चहाच हाॅटेल सुरू केलं आहे. या हॉटेलात आजी वेगवेगळ्या प्रकारचे चहा बनवतात. विशेष म्हणजे हॉटेलच नाव देखील आजीच्याच नावानं ठेवलं आहे. आजीच्या चहाला एक वेगळीच चव आहे. हा चहा आरोग्यदायी चहा आहे. चहा बनविण्याचा मोठा अनुभव असल्यामुळे आजीची अगदी उत्तम चहा बनवितात. आदरक, विलायची, गवती, पावडर, प्युअर दुधाचा चहा आजीकडे मिळतो. आजीकडील चहामध्ये ओषधी गुणधर्म असल्यानं येथील आरोग्यदायी चहा पिण्यासाठी गर्दी होते. 

    नोकरी न मिळाल्यानं तरुण बनला चायवाला, D. Ed. B. Ed नावानं सुरू केलं हॉटेल!

    मुलांना मदत

    आजीला दोन मूलं आहेत. दोघेही मुलं रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. चार नातवंड आहेत त्यातील काहींचे लग्न झाले काहींचे शिक्षण सुरू आहे आपल्या मुलांच्या संसाराला आपला हातभार लागावा यासाठी आजी आजही काम करतात. आजी आता लेमन टी बनवणे देखील शिकल्या आहेत. सावेडी येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन समोर आजीचे टी सेंटर आहे. तुम्ही देखील इथं आजींचा स्पेशल चहाचा आस्वाद घेऊ शकता. 

    First published:
    top videos

      Tags: Ahmednagar, Local18