Home /News /maharashtra /

मुख्यमंत्री साहेब, आमच्यासाठी एवढं करा... नगरच्या कामगाराचं उद्धव ठाकरेंना पत्र

मुख्यमंत्री साहेब, आमच्यासाठी एवढं करा... नगरच्या कामगाराचं उद्धव ठाकरेंना पत्र

तर कारखाना व्यवस्थापक कारखाना मालक हे कामगारांना अक्षरश: आपले गुलाम बनून राबवून घेतील,

    अहमदनगर, 26 सप्टेंबर: केंद्र सरकारनं कामगारांसंबंधीचं कामगार कायदा सुधारणा विधेयक राज्यसभेत नुकतच मंजूर करण्यात आलं. मात्र, या विधेयकाला देशभरतील कामगार संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. एवढंच नाही तर कामगारांनी आंदोलनं केली. मात्र, केंद्र सरकारनं हा निर्णय मागे घेतला नाही. तरी राज्य सरकारनं पुढाकार घेऊन किमान महाराष्ट्रात तरी हा कायदा लागू करू नये, अशी विनंती करणारं पत्र एका कामगारानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. हेही वाचा...मोदी सरकार केवळ बुडणाऱ्या जहाजाचं छिंद्रं बुजवतंय, रोहित पवारांचा थेट निशाणा तुषार बाळासाहेब सोनवणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिलं आहे. तुषार सोनवणे हे नगर येथील औद्योगिक वसाहतीत ( MIDC)एका खासगी कंपनीत नोकरी करतात. नव्या कामगार कायद्यामुळे कामगारांच्या हक्कावर गदा येणार आहे. त्यामुळे किमान महाराष्ट्रात तरी हा कायदा लागू करू नये, अशी विनंती तुषार सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. काय म्हटलं आहे पत्रात? 'केंद्र सरकारनं मांडलेलं कामगार सुधारणा श्रमसंहिता विधेयक राज्यसभेत मंजूर झालं आहे. हा कायदा लवकरच देशभरात लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ते अतिशय चुकीचे व सर्वसामान्य कामगारांच्याविरोधात आहे. आधीच कायदे कामगारांचे बाजूचे नसताना आता नवीन कामगार सुधारक विधेयक पारित करून सरकार कामगारांना कंपनी व्यवस्थापन व मालकांच्या हाताचे बाहुले बनवू इच्छित आहे काय? हा कायदा जर महाराष्ट्रात लागू झाला तर कारखाना व्यवस्थापक कारखाना मालक हे कामगारांना अक्षरश: आपले गुलाम बनून राबवून घेतील, कामगारांची मुस्कटदाबी होईल, तसेच कामगारांना आपले हक्क अधिकार मागता येणार नाहीत. आज कामगार संघटित होऊन आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करीत आहे त्याला पुढील काळात संघटित होता येणार नाही. ज्या बोटावर मोजण्या इतक्या प्रामाणिक कामगार संघटना आहेत त्या मोडीत निघतील मी एक सर्वसामान्य कामगार आपणास आग्रहाची विनंती करीत आहे की जर केंद्र सरकारने कायदा अमलात आणला, लागू केला तर आपण हा कायदा महाराष्ट्रात लागू करू नये.' केंद्रातील मोदी सरकारच्या या निर्णयानं महाराष्ट्रातील सर्वसामान्य कामगार अतिशय भयभीत झाला आहे. आपण पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य कामगारांना आश्वासन द्यावे, की मोदी सरकारने केंद्रात हा कायदा लागू केला तरी महाराष्ट्रातील आघाडी सरकार हा कायदा महाराष्ट्रात लागू करणार नाही. जनतेला आपण असे आश्वासन दिलं तर पुढील काळात सर्वसामान्य गोरगरीब कामगार हा नक्कीच आपल्या बाजूने उभा राहील.', असं कामगार तुषार सोनवणे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. काँग्रेसचा मशाल मोर्चा... दुसरीकडे, केंद्र सरकारनं कृषी विषयक धोरण शेतकऱ्यांविरुद्ध पारित केले असून त्याचा निषेधार्थ पाथर्डी तालुका काँग्रेसच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला होता. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत हा मशाल मोर्चाचे आयोजन केले होते. हेही वाचा...अयोध्येतील रामलल्लानंतर आता मथुरेतील श्रीकृष्णाची कोर्टात धाव, शाही मशीद हटवा केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांच्या विरोधात बहुमताच्या जोरावर जे कृषिविषयक विधेयक संमत केले आहे.विधेयकाचे तरतुदी या अत्यंत जाचक आहेत शेतकरी बांधवांवर अन्याय करणारे आहेत. यामुळे भारतातील शेतकरी वर्ग विस्थापित होण्याचा धोका वाढला आहे. सदर करार पद्धत अस्तित्वात आल्यास गरीब शेतकरी वर्ग यामध्ये भरडला जाण्याची शक्यता आहे. या विधेयकाच्या अनेक तरतुदी या शेतकरी बांधवांवर अन्याय करणाऱ्या असून केंद्र सरकारने या  हे विधेयक त्वरित रद्द करावे अन्यथा रस्त्यावर उतरू आंदोलन करू, असा इशारा यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष नासिर शेख यांनी दिला आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Ahmednagar, Maharashtra, Udhav thackarey

    पुढील बातम्या