मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'माझ्याकडे काय बघतो पैसे काढ', बंदुकीचा धाक दाखवून युवकाचं अपहरण

'माझ्याकडे काय बघतो पैसे काढ', बंदुकीचा धाक दाखवून युवकाचं अपहरण

'माझ्याकडे काय बघतो', असं म्हणत चाकूचा धाक दाखवून युवकाला बळजबरी बाईकवर बसवलं आणि बैलबाजार भागात घेऊन गेले. तिथे जे घडलं ते धक्कादायक होतं.

    प्रतिनिधी साहेबराव कोकणे, अहमदनगर, 19 ऑगस्ट : पैशांसाठी युवकाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. माझ्याकडे काय बघतो? असं म्हणून एका युवकाला चाकूचा धाक दाखवून मोटारसायकलवर बसवून तीन जण घेऊन गेले. तिघांनी जीवे मारण्याची धमकी देऊन युवकाचं अपहरण केलं. 50 हजार रुपये न दिल्यास पिस्तूलने गोळ्या घालून मारण्याची धमकी देतात अशी फिर्याद एका युवकाने दाखल केल्यावरून पोलीसांनी तीन जणावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. माझ्याकडे काय बघतो असे म्हणून चाकूचा धाक दाखवून त्यांच्या मोटार सायकलवर मध्यभागी बळजबरीने बसवून बैलबाजार भागात घेऊन गेले. तीन जणांनी मिळून त्याला तलावाजवळ नेलं. आत्ताच्या आत्ता ५० हजार रुपये मागवून घे नाहीतर पिस्तूलाने गोळ्या घालू अशी जीवे मारण्याची धमकी दिली, असं फिर्यादीनं पोलिसांना सांगितलं. त्यावेळी त्यांना आत्ता पैसे नाहीत घरी चला तेथे देतो असं सांगून घरी आणलं. घरी आल्यावर पैसे देण्यासाठी वेळ लागल्याने वडिलांनाही तिघांनी शिवीगाळ केल्याचं सांगितलं. पैसे न दिल्यास जीवे मारू अशी धमकीही दिली. या भीतीनं आरडाओरडा केल्याने तिघे पोलिसांच्या भीतीनं पसार झाले. कृष्णा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नितीन रोहीदास डोकडे, अक्षय विजय धोत्रे आणि कुणाल पवार यांच्यावर कलम ३८४, ३६३, ३२३, अन्वये गुन्हा दाखल केला. यातील मुख्य आरोपी नितीन डोकडे उर्फ बिल्ला यास पोलिसांनी रविवारी अटक केली.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Ahmednagar, Ahmednagar News

    पुढील बातम्या