मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावाच्या पत्नीचा राहत्या घरात आढळला मृतदेह, परिसरात खळबळ

मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावाच्या पत्नीचा राहत्या घरात आढळला मृतदेह, परिसरात खळबळ

मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख यांचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला आहे.

  • Share this:

अहमदनगर, 7 नोव्हेंबर : ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख यांचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला आहे. गौरी प्रशांत गडाख (वय 38) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज शनिवारी रात्री उशीरा ही घटना उघडकीस आली.

शनिवारी सायंकाळी 6 च्या सुमारास त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी नातेवाईकांना आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. तर या प्रकरणी आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

खाजगी रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, सायंकाळी त्यांना रुग्णालयात आणण्यात आले, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नियमानुसार याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात येऊन पुढील तपास सुरू केला आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

गौरी या यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव आणि जल संधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत यांच्या पत्नी होत. तर राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजयी होत्या. गौरी यांचे माहेर लोणी (ता. राहाता) येथील आहे. त्या थेट राजकारणात सक्रीय नसल्या तरी पती प्रशांत यांनी स्थापन केलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्या कार्यरत होत्या.

Published by: Akshay Shitole
First published: November 7, 2020, 10:53 PM IST

ताज्या बातम्या