Home /News /maharashtra /

Ahmednagar Rain Update : मुळा धरणाचा उजवा कालवा फुटला! हजारो लिटर पिण्याचं पाणी वाया video

Ahmednagar Rain Update : मुळा धरणाचा उजवा कालवा फुटला! हजारो लिटर पिण्याचं पाणी वाया video

पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे मुळा धरण 35.23 टक्के भरले आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

  अहमदनगर, 15 जुलै : मागच्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. झालेल्या पावसाने शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान झालेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. दोन दिवसांत जिल्ह्यात 46.2 मिमी पाऊस झाला. आतापर्यंत 159.8 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे मुळा धरण 35.23 टक्के तर भंडारदरा धरण 42 टक्के भरले आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली. (Ahmednagar Rain Update)

  दरम्यान जोरदार पाऊस झाल्याने धरण क्षेत्रात पाण्याचा दाब वाढल्याने मुळा धरणाचा उजवा कालवा फुटला आहे. यामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात ही घटना घडली आहे. देवगाव येथे सकाळच्या दरम्यान अचानक कालवा फुटल्याने पिण्याचे पाणी वाया जात आहे. पुढच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेले पाणी वाया गेल्याने कालव्याच्या अखत्यारित असणाऱ्या गावांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

  हे ही वाचा : Sanjay Raut & Sharad Pawar : फडणविसांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार, संजय राऊतांचा दौरा, नागपुरात भेट होण्याची शक्यता

  दरम्यान कालवा फुटल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कालव्याला मोठे भगदाड पडल्याने कित्येक एकर शेतीतून पाणी जात असल्याने पिके उन्मळून पडत आहेत. राहुरीत मुळा धरणातून हे पाणी सोडण्यात आले होते. दरम्यान कालवा फुटला असल्याचे प्रशासनाच्या लक्षात येताच पाणी बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

  धरणात पाण्याची आवक अशी :

  भंडरदरा 760 क्युसेक्स, निळवंडे 414, मुळा धरणात 543 तर आढळा धरणात अवघ्या 2 क्युसेक्स वेगाने रविवार ता.10 जुलै रोजी नवीन पाण्याची आवक सुरू आहे. आतापर्यंत भंडारदरा धरणात जून पासून आज अखेर नव्याने एकुण 2 हजार 407 दशलक्ष घनफूट, निळवंडे धरणात 1 हजार 845 तर मुळा धरणात अवघे 925 दशलक्ष घनफूट नवीन पाणी पोहोचले आहे.

  हे ही वाचा : पुन्हा एकदा काय हाटील, काय समुद्र..एकदम ओक्के! शिंदे, फडणवीसांकडून आमदारांना हॉटेलवर बोलावणं

  जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा असा :

  भंडारदरा 42.47 टक्के, निळवंडे 48.68 टक्के, मुळा 35.23 टक्के, आढळा 39.15 टक्के, मांडओहळ 14.81 टक्के, घा. पारगाव 19.90 टक्के, घोड 24.88 टक्के, सीना 28.27 टक्के, खैरी 24.54 टक्के, विसापूर धरणातील साठा 57.50 टक्के आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Ahmednagar, Ahmednagar News, Rain fall, Rain flood

  पुढील बातम्या