Home /News /maharashtra /

एका लग्नाची दुसरी गोष्ट; एकाच दिवशी दोनदा विवाह

एका लग्नाची दुसरी गोष्ट; एकाच दिवशी दोनदा विवाह

अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातील जळगाव येथील सागर वैराळ कोपरगाव तालुक्यातील प्रियंका घारु यांचा विवाह नुकताच पार पडला.

अहमदनगर, 25 मे : तोच नवरदेव.. तीच नवरी.. विवाह मात्र दोनदा.. आणि तोही एकाच दिवशी.. ऐकून आश्चर्य वाटले ना? मात्र सागर आणि प्रियांका या नवदाम्पत्याच्या जीवनात हा अनोखा योगायोग जुळून आलाय.. आणि एकाच दिवशी दोनदा संपन्न झालेल्या या विवाहाची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातील जळगाव येथील सागर वैराळ कोपरगाव तालुक्यातील प्रियंका घारु यांचा विवाह नुकताच पार पडला. विवाहाचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर वधुवरांसह वर्‍हाडी मंडळी सायंकाळच्या सुमारास जळगाव येथे पोहचले. वराकडून वरातीची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी जळगावात रामकथेचा कार्यक्रम सुरू होता. योगायोगाने त्याच दिवशी रामकथेतील सिता स्वयंवराच्या प्रसंगाचे निरूपण महाराज करत होते. सिता स्वयंवरात पुन्हा या नववधुवरांचा विवाह लावण्याची कल्पना गावकऱ्यांना सुचली. (काश्मीरमध्ये हिंसाचार घडवणाऱ्या यासिन मलिकचा पापाचा घडा भरला, कोर्टाकडून जन्मठेपेची शिक्षा) गावकर्‍यांचा प्रस्ताव ऐकल्यानंतर हर्ष उल्हासीतवर पित्याने वरात थांबवून तात्काळ गावकर्‍यांच्या प्रस्तावाला होकार दिला आणि वधुवरांसह वैराळ कुटुंब रामकथा सुरू असलेल्या ठिकाणी पोहचले. रामायणातील पात्राप्रमाणे वर सागर व वधू प्रियंका यांना राम सितेप्रमाणे मुकूट परिधान करण्यात आला. सुमधूर आवाजात मंगलअष्टके म्हणून हा विवाह पुन्हा एकदा संपन्न केला. हा विवाह पाहण्यासाठी संपूर्ण गाव उपस्थित होते. अशा पद्धतीने एकाच दिवशी दोनदा विवाह करण्याचे भाग्य सागर आणि प्रियंका या वधू-वरांना मिळाले. त्यामुळे या विवाह सोहळ्याची आता राज्यभरात चर्चा रंगू लागली आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या