Home /News /maharashtra /

शिवसेनेत जातीपातीचं राजकारण; शिवसैनिकाचा गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्र्यांनाच लिहिलं पत्र

शिवसेनेत जातीपातीचं राजकारण; शिवसैनिकाचा गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्र्यांनाच लिहिलं पत्र

अन्यथा पुढील काळात शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागेल....

    अहमदनगर, 29 सप्टेंबर: शिवसेनेतील अंतर्गत वाद आला चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेत जातीपातीचं राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यानं केला आहे. त्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडली आहे. नाराज पदाधिकाऱ्यानं याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. मनपा स्वीकृत नगरसेवक निवडीत शिवसेनेत जातीचं राजकारण केले जात असल्याचे या पत्रात स्पष्ट केलं आहे. हेही वाचा...मध्यावधी निवडणूक? संजय राऊतांकडून चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचं खंडन शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख चंद्रकांत शेळके यांनी तर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून शिवसेनेत जातीचं राजकारण केलं जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. येत्या एक ऑक्टोबरला नगर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे. मात्र, यावरून आता शिवसेनेतील अंतर्गत वाद समोर येऊ लागला आहे. चंद्रकांत शेळके यांनी पत्रात म्हटलं आहे की, 'नगरमध्ये आजपर्यंत दिवंगत अनिल भैया राठोड यांनी कधीही जातीचे राजकारण शिवसेनेत केले नाही. त्यामुळेच नगरमध्ये शिवसेना संघटना बळकट राहिली. परंतु काही दिवसापासून जातीचे राजकारण करून दिवंगत अनिल भैया राठोड यांना पराभूत केले होते. आजही स्वीकृत नगरसेवक भरतीवेळी जातीचे राजकारण करून दोन्ही उमेदवार एकाच जातीचे दिले आहेत. नगरची शिवसेना एक तर भाऊ कोरेगावकर यांनी व काही जातीवादी फुटीर शिवसैनिकांनी आपल्या पक्षाला गळती लावायचे काम करत आहेत. तरी आपण यात तातडीने लक्ष घालावे, व नगरच्या शिवसेनेमध्ये चाललेली धुसफूस थांबवावी. अन्यथा यापुढील काळात शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागेल,' असेही त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. चंद्रकांत शेळके यांनी या पत्राची प्रत शेळके यांनी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख तसेच शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी देखील दिली आहे. मुख्यमंत्री साहेब, आमच्यासाठी एवढं करा... केंद्र सरकारनं कामगारांसंबंधीचं कामगार कायदा सुधारणा विधेयक राज्यसभेत नुकतच मंजूर करण्यात आलं. मात्र, या विधेयकाला देशभरतील कामगार संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. एवढंच नाही तर कामगारांनी आंदोलनं केली. मात्र, केंद्र सरकारनं हा निर्णय मागे घेतला नाही. तरी राज्य सरकारनं पुढाकार घेऊन किमान महाराष्ट्रात तरी हा कायदा लागू करू नये, अशी विनंती करणारं पत्र एका कामगारानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. तुषार बाळासाहेब सोनवणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिलं आहे. तुषार सोनवणे हे नगर येथील औद्योगिक वसाहतीत ( MIDC)एका खासगी कंपनीत नोकरी करतात. नव्या कामगार कायद्यामुळे कामगारांच्या हक्कावर गदा येणार आहे. त्यामुळे किमान महाराष्ट्रात तरी हा कायदा लागू करू नये, अशी विनंती तुषार सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. 'केंद्र सरकारनं मांडलेलं कामगार सुधारणा श्रमसंहिता विधेयक राज्यसभेत मंजूर झालं आहे. हा कायदा लवकरच देशभरात लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ते अतिशय चुकीचे व सर्वसामान्य कामगारांच्याविरोधात आहे. आधीच कायदे कामगारांचे बाजूचे नसताना आता नवीन कामगार सुधारक विधेयक पारित करून सरकार कामगारांना कंपनी व्यवस्थापन व मालकांच्या हाताचे बाहुले बनवू इच्छित आहे काय? हा कायदा जर महाराष्ट्रात लागू झाला तर कारखाना व्यवस्थापक कारखाना मालक हे कामगारांना अक्षरश: आपले गुलाम बनून राबवून घेतील, कामगारांची मुस्कटदाबी होईल, तसेच कामगारांना आपले हक्क अधिकार मागता येणार नाहीत. आज कामगार संघटित होऊन आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करीत आहे त्याला पुढील काळात संघटित होता येणार नाही. ज्या बोटावर मोजण्या इतक्या प्रामाणिक कामगार संघटना आहेत त्या मोडीत निघतील मी एक सर्वसामान्य कामगार आपणास आग्रहाची विनंती करीत आहे की जर केंद्र सरकारने कायदा अमलात आणला, लागू केला तर आपण हा कायदा महाराष्ट्रात लागू करू नये.' हेही वाचा...राऊत-फडणवीसांच्या भेटीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... केंद्रातील मोदी सरकारच्या या निर्णयानं महाराष्ट्रातील सर्वसामान्य कामगार अतिशय भयभीत झाला आहे. आपण पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य कामगारांना आश्वासन द्यावे, की मोदी सरकारने केंद्रात हा कायदा लागू केला तरी महाराष्ट्रातील आघाडी सरकार हा कायदा महाराष्ट्रात लागू करणार नाही. जनतेला आपण असे आश्वासन दिलं तर पुढील काळात सर्वसामान्य गोरगरीब कामगार हा नक्कीच आपल्या बाजूने उभा राहील.', असं कामगार तुषार सोनवणे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Ahmednagar, Shiv sena, Shiv Sena (Political Party), Udhav thackeray

    पुढील बातम्या