Home /News /maharashtra /

अहमदनगर हादरलं, गर्भपात करून अर्भकाचे केले पाच तुकडे, नराधम डॉक्टराला अटक

अहमदनगर हादरलं, गर्भपात करून अर्भकाचे केले पाच तुकडे, नराधम डॉक्टराला अटक

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अहमदनगर, 24 जून : कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. कोरोनाविरोधात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहे. डॉक्टरांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. परंतु, अहमदनगरमध्ये डॉक्टरी पेशाला धक्का देणारी घटना समोर आली आहे. आरोपी डॉ शंकरप्रसाद उर्फ सुनील गंधे याने महिलेचा गर्भपात करून त्या अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केल्याचे समोर आले. या प्रकरणी सुनील गंधेला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. अहमदनगर तालुक्यातील जखणगाव यातील गंधे सर्जीलकल हॉस्पिटलमध्ये गर्भपात झाल्याची माहिती अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांना निनावी फोन आला त्यांनाही गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप मुरणबीकर यांना माहिती दिली. डॉक्टरांच्या पथकाने हॉस्पिटलमध्ये जाऊन कारवाई केली. कारवाई दरम्यान आरोपी डॉ.शंकरप्रसाद उर्फ सुनील गंधे यांनी त्या महिलेचा गर्भपात करून त्या अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केल्याचे समोर आले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक: कोरोनामुळे 12 कोटी मुलांना दोन वेळचं जेवणही मिळणे होणार अवघड डॉ. प्रदीप मुरणबीकर हे त्यांची टीम घेऊन जखणगाव येथे जाऊन संबंधित हॉस्पिटलवर कारवाई केली.  यावेळी नर्सिंग होम असल्याचे प्रमाणपत्र त्यांना डॉक्टरांना दाखवता आले. परंतु, मेडिकल ट्रमिनेशन ऑफ प्रेगनन्सीचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते. जेव्हा दवाखान्यामध्ये चौकशी केली त्या वेळेस एक स्त्री नुकताच गर्भपात करण्यात आलेला होता,  त्या महिलेशी विचारना केली  असता तीन मुली असल्याचे तिने सांगितले मग चौथ्यांदा मुलगी असावी या शंकेनं गर्भपात केला का या बाबत शंका निर्माण झाली. त्यावेळेस त्याच्याकडे असलेले कागदपत्र सोनोग्राफी केलेलं डॉक्टर कर्डीले यांच्याकडेच सोनोग्राफीचा रिपोर्ट होता. त्या रिपोर्टमध्ये सतरा आठवडे अधिक दोन दिवस गर्भाची वाढ होते असं लिहिलेलं होतं. अरेरे! आजोबांच्या नोकरीवर नातवाचा डोळा, सुपारी देऊन केली त्यांची हत्या त्या अनुषंगाने पुढे तपासणी केली असता  गर्भपात केल्यानंतर ज्या पद्धतीने असायला हवं तसं नसता, खांद्यापासून हात वेगळा केलेला दोन्ही कमरेपासून दोन्ही पाय वेगळे केलेले असे पाच भाग आढळून आले.  या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये कलम 312 313 315  अंतर्गत डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी या डॉक्टराला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. संपादन - सचिन साळवे
First published:

पुढील बातम्या