Home /News /maharashtra /

हॅप्पी बर्थ डे म्हणायचं राहून गेलं, कोरोनाने वाढदिवसालाच मित्र गेला!

हॅप्पी बर्थ डे म्हणायचं राहून गेलं, कोरोनाने वाढदिवसालाच मित्र गेला!

मित्रांनी रात्री 12 वाजेनंतर वाढिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या. पण, सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचली.

    सोनई, 20 एप्रिल : अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. सोनई इथं एका तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशीच कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील सोनई येथील राजस्थानी युवा मंचाचा कार्यकर्ता ओंकारलाल भळगट (वय 33) याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नगरमध्ये बेड उपलब्ध नसल्यामुळे ओंकारला औरंगाबादमध्ये हलवण्यात आले होते. पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला, असं वृत्त दैनिक सकाळने दिले आहे. प्रसादाच्या थाळीत कांदा का?; अभिनेत्री कंगणा रणौतने ट्रोलर्सना दिलं उत्तर धक्कादायक म्हणजे, ओंकारलालचा वाढदिवस होता, त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. मित्रांनी रात्री 12 वाजेनंतर वाढिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या. पण, सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचली. त्यामुळे मित्र परिवारात दुखाचा डोंगर कोसळला. ज्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्याची नामुष्की मित्रांवर ओढावली. कोविड सेंटरमधील महिलांचा एकटेपणा झाला दूर; सोबतीसाठी आल्या ‘कर्मचारी सखी’ ओंकार हा राजस्थानी युवा मंचचा धडाडीचा कार्यकर्ता होता. मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात त्याने अनेक गरजू लोकांना अन्न धान्याचे वाटप केले होते. सहा दिवसांपूर्वी त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याच्यावर कोविड सेंटरमध्ये उपचारही करण्यात आले होते. पण अधिक त्रास होत असल्यामुळे औरंगाबादला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील आणि पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी आहे. ओंकारलालच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या