अहमदनगरमध्ये सर्वच पक्षांनी कंबर कसली, कोण मारणार बाजी?

अहमदनगरमध्ये सर्वच पक्षांनी कंबर कसली, कोण मारणार बाजी?

राजकीय दृष्ट्या नगर हा अतिशय संवेदनशील जिल्हा असून यावेळी नगरवासी कुठला कोल देतात याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.

  • Share this:

अहमदनगर , 30 नोव्हेंबर : अहमदनगर महापालिकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काँगेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली असून राष्ट्रवादीनं ४५ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि आमदार अरुण जगताप यांनी राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा घेतलीय. तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे दोन मात्तबर नेते काँग्रसची खिंड लढवत आहेत.

राज्याच्या पातळीवरचे हे दोन मोठे नेते काँग्रेसकडे असले तरी पक्षाला पालिकेत समर्थ नेतृत्वच नाही. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे हे एकाकी खिंड लढवत आहेत. त्यातच केडगाव मधील काँग्रेसचे नगरसेवक अचानक भाजपात केल्याने काँग्रेसला फटका बसलाय.

अहमदनगर महानगर पालिकेच्या राजकारणात नेहमी किंगमेकर असलेले भाजप आमदार शिवाजीराव कर्डीले अजून सक्रिय झाले नाहीत. महानगर पालिकेत गेल्या 15 वर्षात जनतेनं सर्वच पक्षांना संधी दिली. पहिल्या पाच वर्षात शिवसनेना आणि काँग्रेस दुसऱ्या पाच वर्षात राष्ट्रवादी आणि शिवसेना तर तिसऱ्या पाच वर्षात राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी सत्ता राहिली.

भाजपला मात्र कधीच महापौरपद मिळालं नाही. यावेळी महापालिका खेचून आणण्यासाठी भाजपने पुर्ण जोर लावला आहे. भाजपचे प्रदशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरूवारी भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडला. या वेळी धुळ्याचे लोक भाजपलाच पहिली पसंती देतील अशी आशा व्यक्त केली.

भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्यावरही पक्षाने जबाबदारी टाकली आहे. निवडणुकीला आता फक्त 10 दिवस राहिले आहे. राजकीय दृष्ट्या हा अतिशय संवेदनशील जिल्हा असून यावेळी नगरवासी कुठला कोल देतात याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.

 

 

First published: November 30, 2018, 6:07 PM IST

ताज्या बातम्या