नगर : महिला कुस्तिपटूचा श्रीपाद छिंदमने केला पराभव

नगर : महिला कुस्तिपटूचा श्रीपाद छिंदमने केला पराभव

अंजली देवकर-वल्लाकट्टी यांचं राजकारणाच्या आखाड्यात मैदान गाजविण्यांचं स्वप्न भंग पावलं.

  • Share this:

अहमदनगर, 10 डिसेंबर :  भाजपकडून वार्ड क्रमांक 9 मधून निवडणूक लढविणाऱ्या महिला कुस्तीपटू अंजली देवकर-वल्लाकट्टी यांचा निवडणुकीच्या आखाड्यात पराभव झाला. वादग्रस्त अपक्ष उमेदवार श्रीपाद छिंदम यांनी त्यांचा 2000 मतांनी पराभव केला. त्यामुळं राजकारणाच्या आखाड्यात मैदान गाजविण्यांचं त्यांचं स्वप्न भंग पावलं.

लाठीकाठी आणि  दांडपट्टा शिकता शिकता जागतिकस्तरावर महिला कुस्तीपटू म्हणून लौकिक मिळविलेल्या  अंजली देवकर-वल्लाकट्टी अहमदनगर महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या होत्या. वार्ड क्रमांक 9 मधून भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती. कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चित करणाऱ्या अंजली निवडणुकीच्या रिंगणातही कमाल केली.

नगरच्या पहिल्या महिला कुस्तीपटू असलेल्या अंजली देवकर-वल्लाकट्टी यांनी कुस्ती, ज्युदो कराटे आणि अन्य विविध खेळांतून सहभाग घेत 21 सुवर्ण, 11 ब्राँझ पदकं मिळवली आहेत. पंजाबमधील महिलांच्या कुस्ती स्पर्धेत पंच म्हणूनही काम केलाय. नगरला महिला कुस्ती स्पर्धा आयोजनातही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांची  कौटुंबिक परिस्थिती गरिबीची होती.

आईचे आजारप असताना सगळं सांभाळून त्यांनी शिक्षण सुरू असताना लाठीकाठी आणि  ज्युदो कराटेचे प्रशिक्षण घेतले. आणि महिला कुस्तीच्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला. पोलंडच्या जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत त्यांना त्या सहाव्या क्रमांकावर होत्या. त्यानंतर त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळालाय.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना 50 हजाराचे बक्षीस देऊन गैरविलं. तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला.

महिलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे ती कुशल प्रशासक होऊ शकते. समाजकार्याला जर राजकारणाची जोड मिळली तर चांगलं काम होऊ शकतं असं मत अंजली देवकर-वल्लाकट्टी  यांनी व्यक्त केलं.

VIDEO : नगरमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार, गाड्यांची तोडफोड

First published: December 10, 2018, 4:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading