अहमदनगर : पालिका निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या जवानाचा आकस्मिक मृत्यू

अहमदनगर : पालिका निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या जवानाचा आकस्मिक मृत्यू

निवडणुकीच्या धावपळीत गृहरक्षक दलाच्या एका जवानाचा अकस्मात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

  • Share this:

अहमदनगर, ता.9 डिसेंबर : अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या गृहरक्षक दलाच्या एका जवानाचा झोपेतच मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडालीय. जामखेड येथून आलेले सतीश सुभाष जगताप गृहरक्षक पथकासह शनिवारी  पोलीस मुख्यालयात हजर झाले होते. रात्री जेवण करून झोपल्यानंतर सकाळी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला मात्र ते बेशुद्धावस्थेत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्यांना तातडीने अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर तपासणी केली असता डॉक्टरांनी त्यांना मृत असल्याचे घोषित केलं.

याबाबत गृहरक्षक दलाचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी शासकीय रुग्णालयातील पाहणी करत चौकशी केली. सतीश जगताप यांचं शवविच्छेदन करण्यात येत असून त्याचा अहवाल आल्यानंतरच त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याची सविस्तर माहिती कळू शकणार आहे.

मात्र त्यांच्या सोबत असलेल्या पसहकाऱ्यांनी पोलीस दलाकडून सर्व प्रकारची सुविधा आणि व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली. या बाबत कोणतीही इतर तक्रार नसल्याचे त्यांच्या सहकार्‍यांनी सांगितलं. आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सतीश देशमुख यांच्या मृत्यूचं कारण उलगडणार आहे. मात्र निवडणुकीच्या धावपळीत गृहरक्षक दलाच्या एका जवानाचा अकस्मात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

आज मतदान

धुळे

धुळे महापालिका निवडणुकीत भाजपा, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, लोकसंग्राम, MIM, समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्यात हे पक्ष समोरासमोर आहेत. मुख्य लढत ही भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी अशी होणार आहे. तर दुसरीकडे, भाजपाचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी लोकसंग्राम या पक्षाच्या तिकिटावर स्वतंत्र उमेदवार उभे करून त्यांनी भाजपला चांगलंच आव्हान दिलंय.

ही निवडणूक भाजपाचे धुळे महापालिका निवडणुकीचे प्रभारी आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे ह्या प्रभाग क्र 5 मधून स्वतः उमेदवारी करीत आहेत तर प्रभाग क्र. 1 मधून आमदार गोटे यांचा मुलगा तेजस गोटे लोकसंग्रामच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

अहमदनगर

अहमदनगर महानगर पालिका निवडणुकां मध्ये 339 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत भाजपचे खासदार दिलीप गांधी पुत्र सुवेंद्र गांधी, सुन दीप्ती गांधी महापालिकेच्या आखाड्यात उतरलेले आहेत. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची कन्या तथा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची पत्नी शीतल जगताप, कर्डिलेंची दुसरी कन्या ज्योती गाडे देखील रिंगणात उतरल्या आहेत.

शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मातब्बरांच्या जय्यत तयारीमुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे.

 

Video : लग्नानंतरही आशियात सर्वात ‘सेक्सी’ दीपिकाच, प्रियांका चोप्राला टाकलं मागे

First published: December 9, 2018, 8:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading