मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'माझ्यावर टीका होईल पण...'; सुजय विखेंनी थेट दिल्लीहून नगरला गुपचूप आणला Remdesivir चा मोठा साठा

'माझ्यावर टीका होईल पण...'; सुजय विखेंनी थेट दिल्लीहून नगरला गुपचूप आणला Remdesivir चा मोठा साठा

भाजप नेते आणि नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe patil) यांनी दोन दिवसांपूर्वी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा नगरला आणला आहे. कमालीची गुप्तता बाळगत त्यांनी खाजगी विमानानं हा साठा आपल्या मतदार संघासाठी आणला आहे.

  • Published by:  News18 Desk

अहमदनगर, 25 एप्रिल: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रसार वेगाने वाढत आहे. आता राज्यातील काही प्रमुख शहरांना कोरोनानं विळखा घातल्यानंतर त्याने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. परिणामी स्थानिक आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था अक्षरशः कोलमडून पडल्या आहेत. तर दुसरीकडे, रुग्णालयातील बेडसोबतचं रेमडेसिव्हीर इंजेक्शन (Remdesivir) आणि ऑक्सिजन तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे

रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना बरीच ओढाताण करावी लागत आहे. दरम्यान कोरोना बाधित रुग्णांची हेळसांड होतं आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आतापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. ही गरज लक्षात घेऊन भाजप नेते आणि नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe patil) यांनी दोन दिवसांपूर्वी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा नगरला आणला आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी कमालीची गुप्तता बाळगत दिल्लीहून हा साठा नगरला आणला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः आपल्या फेसबुक अकाउंटवरून दिली आहे.

यावेळी त्यांनी एक व्हिडीओ आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला असून, या व्हिडीओत दिल्लीहून नगरला रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणण्यापर्यंतचा प्रवास धावत्या पद्धतीनं दाखवला आहे. त्यांनी आपले वैयक्तिक संबंधाचा वापर करून दिल्लीवरून रेमडेसीवरचा मोठा साठा गुपचूप पद्धतीनं आपल्या मतदारसंघातील रूग्णांसाठी आणला आहे. यासाठी त्यांनी एका खाजगी विमानाचा वापर केला आहे. त्यांची ही कृती कायदेशीर नसल्याची टीका होऊ शकते, असं त्यांनी स्वत:च म्हटलंय आहे. पण हे सर्व आपण आपल्या जिल्ह्यासाठी केल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.

(हे वाचा- Corona Outbreak: नगरभोवती घट्ट होतोय कोरोनाचा विळखा, रुग्णांना होम क्वारंटाइन करणं ठरतंय घातक)

आपले वैयक्तिक संबंध वापरून हा रेमडेसिवीरचा साठा आणल्याचं त्यांनी सांगितलं असलं तरी विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर दुसरीकडे तमाम विखे समर्थक मात्र खूश असून त्यांनी सुजय विखे पाटलांना पाठिंबा दिला आहे. संबंधित सर्व इंजेक्शन्स सर्व पक्षातील गरजू लोकांना देणार असल्याचा निर्वाळा त्यांनी यावेळी दिला आहे. कोणी काहीही म्हणो, पण मला माझ्या जिल्ह्यातील लोकांचे जीव वाचवायचे होते. म्हणूनच मी स्वःखर्चाने रेमडेसिवीरचा साठा नगरकरांना उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर 100 इंजेक्शन्स सरकारी दवाखान्यासाठी मोफत देणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

First published:

Tags: Ahmednagar, BJP