Home /News /maharashtra /

क्रेनची वायर तुटली, विहिरीत उतरताना तांत्रिक बिघाड पती पत्नीच्या जीवावर

क्रेनची वायर तुटली, विहिरीत उतरताना तांत्रिक बिघाड पती पत्नीच्या जीवावर

अहमदनगर (Ahmednagar) येथील कोपरगाव (Kopargaon) मध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. मुर्शतपूर तालुक्यात (Murshatpur taluka) एका पत्नी पत्नीचा मृत्यू झाला आहे.

    अहमदनगर, 25 एप्रिल: अहमदनगर (Ahmednagar) येथील कोपरगाव (Kopargaon) मध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. मुर्शतपूर तालुक्यात (Murshatpur taluka) एका पत्नी पत्नीचा मृत्यू झाला आहे. क्रेनच्या साहाय्यानं विहिरीत उतरताना क्रेनच्या (crane) तांत्रिक बिघाड झाला. या तांत्रिक बिघाडामुळे क्रेनची वायर तुटली आणि परप्रांतीय मजूर पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. नेमकी कशी घडली घटना सध्या येसगाव येथे शेतकरी गणेश कारभारी रहाणे यांच्या शेतात विहिरीच्या खोदकाम सुरु आहे. रविवारी सकाळी 10 वाजता विहिरीचं खोदकाम करणारे मजूर पती-पत्नी क्रेनच्या साहाय्यानं खाली उतरत होते. त्यावेळी अचानक क्रेनची वायर आणि गेअर बॉक्स तुटला. त्यामुळे दोघेही विहिरीत कोसळले. यात दोघांच्या डोक्याला जबर मार लागला आणि ते गंभीर जखमी झाले. या घटनेत अति रक्तस्राव झाला त्यामुळे दोघांचाही त्यात मृत्यू झाला. 34 वर्षीय जेठालाल जग्गुलाल भील आणि त्यांची पत्नी 30 वर्षीय शांता जेठालाल भील अशी दोघांची नावं आहेत. ते मूळचे राजस्थानातील मौखमपूर येथील रहिवासी आहेत. सध्या ते कामानिमित्त कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे राहत होते. लिंबू वापरून साली सगळेच फेकतात; तुम्ही त्याचा असा स्मार्ट उपयोग करा, पैसाही वाचेल घटनेची माहिती शेतकरी गणेश यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर लगेचच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीनं विहिरीतून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेची नोंद पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Ahmednagar

    पुढील बातम्या