Home /News /maharashtra /

आईसह 3 मुली विहिरीत बुडाल्या, मायलेकींच्या मृत्यूने परिसरात खळबळ

आईसह 3 मुली विहिरीत बुडाल्या, मायलेकींच्या मृत्यूने परिसरात खळबळ

याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

अहमदनगर, 2 जुलै : आईसह 3 मुलींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जामखेड तालुक्यातील कुसडगांव इथं घडली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. स्वाती राम कार्ले वय ३० -आई, कोमल राम कार्ले वय ६ -मुलगी, सायली राम कार्ले वय ९ -मुलगी, अंजली राम कार्ले वय ११ -मुलगी अशी मृतांची नावे आहेत. स्वाती कार्ले यांना तिन्हीही मुली होत्या. या दबावातून त्यांनी मुलींसह स्वत:ला विहिरीत झोकून दिलं का? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मात्र सध्या मिळालेल्या प्राथिमक माहितीनुसार आई आणि 3 मुली अशा चौघींचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. (ही बातमी अपडेट होत आहे.)
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Ahmednagar

पुढील बातम्या