लज्जास्पद! 'अहमदनगरमध्ये बलात्काराची तक्रार दिल्यानंतर पोलीस माझ्यावर हसले', पीडितेचा धक्कादायक खुलासा

लज्जास्पद! 'अहमदनगरमध्ये बलात्काराची तक्रार दिल्यानंतर पोलीस माझ्यावर हसले', पीडितेचा धक्कादायक खुलासा

या प्रकरणात आता पीडितेनं 'News18 लोकमत'वर आणखी एक खुलासा केला असून त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

  • Share this:

साहेबराव कोकणे, अहमदनगर, 2 मार्च : बलात्कार प्रकरणातील तक्रार मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही विवस्त्र करून पेट्रोल टाकून मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. या मारहाणीत पोलिसांचाही समावेश असल्याचा पीडित पतीपत्नीचा आरोप आहे. या प्रकरणात आता पीडितेनं 'News18 लोकमत'वर आणखी एक खुलासा केला असून त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

'बलात्कार प्रकरणातील गुन्हा मागे घ्यावा, यासाठी आरोपींनी मला बेदम मारहाण केली. ही तक्रार घेऊन मी पोलिसांकडे गेले तेव्हा पोलिसांनी आमचं म्हणणं ऐकूण घेतलं तर नाहीच, पण माझ्या पतीला बेदम मारहाण केली. तसंच तेथील पोलीस अधिकारी माझ्यावर हसत होते,' असा धक्कादायक खुलासा पीडित महिलेनं केला आहे. पीडित महिलेच्या खुलाशानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

'पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करणार'

बलात्कार पीडित महिलेला आरोपींकडून होत असलेली मारहाण आणि पोलिसांची संशयास्पद भूमिका समोर आल्यानंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आक्रमक झाले आहेत. 'महाराष्ट्राचं सरकार आणि पोलीस प्रशासन झोपलं आहे का,' असा सवाल करत या प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी हे प्रकरण अधिवेशात उपस्थित करणार असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

अहमदनगरमध्ये 2016 मध्ये एका विवाहित महिलेवर सामुहिक अत्याचार झाला होता. त्याची तक्रार दिल्यानंतर अहमदनगरच्या तोफखाना पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. मात्र तक्रार दिली तर विवस्त्र मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल करू आणि नवऱ्याचे वीर्य काढून बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी आरोपींकडून देण्यात आली असल्याचा दावाही पीडित कुटुंबाने केला आहे.

या प्रकरणामध्ये पोलिसांसह 6 आरोपींचा समावेश आहे. याची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित कुटुंबावर दबाव टाकण्यात येत आहे. मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही आरोपींना जामीन नाकारले आहेत. चार वर्षे उलटूनही गँग रेपसारख्या गंभीर गुन्ह्याचे चार्जशीट दाखल झालेले नाही.

पीडित पती-पत्नीला ही फिर्याद मागे घेण्यासाठी यापूर्वीही महिलेला मारण्याचा प्रयत्न झाला होता. 24 जानेवारीला पीडित पती-पत्नी शासकीय रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर आल्यावर एका रिक्षात बसले. रिक्षामध्ये एक माणूस आधीच बसलेला होता त्याने यांना गुंगीचे औषध देऊन अज्ञात स्थळी नेले. त्याठिकाणी एका बंदिस्त रूममध्ये पती-पत्नीचे कपडे काढून विवस्त्र करून त्याच कपड्यांनी त्यांना टांगण्यात आले. पट्याने मारहाण करत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकण्यात आले.

हेही वाचा- पिस्तुल नकली आहे की असली? असं विचारताच मित्राने झाडल्या गोळ्या

'फिर्याद मागे घ्या, अन्यथा मारून टाकू,' अशी धमकी दिली गेली. मारायचा व्हिडिओ करून जर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला तर तुमची व्हिडीओ क्लिप आम्ही व्हायरल करू अशी धमकी देण्यात आली. जर तुम्ही फिर्याद दिली तर तू याठिकाणी आला होता आणि तू दुसऱ्या महिला अत्याचार केला, अशी फिर्याद तुझ्यावर दाखल करेन, अशी धमकी देण्यात आली होती.

पती-पत्नीने आम्ही तुमच्या विरोधात केस दाखल करणार नाही असे सांगितल्यावर आरोपींनी त्यांना नगरला आणून सोडले. मारहाण करताना आम्ही पोलीस आहोत असेही ही दोन आरोपी सांगत होते. 'कोर्टात जाऊ नको असे सांगितले होते. तरीही तू गेला म्हणून तुझेही हाल केले. आता गेला तर तुला जिवंत सोडणार नाही,' अशी धमकी देण्यात आल्याचा पीडितांचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांचेही नाव आल्याने पीडित पती-पत्नीला न्याय मिळणार का, याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

First published: March 2, 2020, 7:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading