अहमदनगर, 21 मे: कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू (Covid patient died) झाल्याने संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयात तोडफोड (hospital vandalised) तसेच डॉक्टरांवर हल्ले (attack on doctors) करण्याच्या घटना सुरूच आहेत. आता अशीच एक घटना अहमदनगर येथे घडली आहे. नगर शहरातील तारकपूर (Tarakpur Ahmednagar) येथील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली आणि डॉक्टरांवरही हल्ला केला.
नगर शहरातील तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटल येथे एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या मृतकाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली आणि डॉक्टरांवर जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला इतका भयंकर होता की, डॉक्टर राहुल ठोकळ यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांना 30 टाके पडले आहेत.
वाचा: नियम तोडून लग्नसमारंभात सहभागी होणं भोवलं; 95 जणांना कोरोनाची लागण, नवरीच्या वडिलांचा मृत्यू
आरोग्य अधिकारी राहुल ठोकळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर ककड कारवाई करावी अशी मागणी सिटी स्क्वेअर हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी संचालक डॉ. संदिप सुराणा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले. यावेळी हॉस्पिटलमधील कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. संदीप सुराणा म्हणाले की, रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात डॉक्टर ठोकळ यांचा हात फॅक्चर झाले असून त्यांना 30 टाके पडले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शहारत यापूर्वी सुद्धा एक कोविड सेंटर आणि एका कोविड हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांना डॉक्टरकडून मारहाण करण्यात आली होती. नातेवाईकांनीच डॉक्टरला मारहाण केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Coronavirus