मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अहमदनगर : सर्व शिक्षा अभियानाचं धक्कादायक चित्र, शाळेतील खोल्या पाडल्या; मुलांचे झाडाखाली वर्ग सुरू

अहमदनगर : सर्व शिक्षा अभियानाचं धक्कादायक चित्र, शाळेतील खोल्या पाडल्या; मुलांचे झाडाखाली वर्ग सुरू

चार वर्षांपूर्वी शाळेतील खोल्या पाडण्यासाठी घाई करण्यात आली होती. मात्र पुन्हा बांधण्यासाठी कोणतीही कारवाई होत नसल्याने झाडाखाली बसून मुलांना धडे गिरवावे लागत आहेत.

अहमदनगर, 4 ऑगस्ट : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील मुलांना झाडाखाली बसून धडे गिरवण्याची वेळ आली आहे. चार वर्षांपूर्वी शाळेतील खोल्या पाडण्यासाठी घाई करण्यात आली होती. मात्र पुन्हा बांधण्यासाठी कोणतीही कारवाई होत नसल्याने झाडाखाली बसून मुलांना धडे गिरवावे लागत आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीच्या वर्गात शंभरावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चार वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात शाळा कोसळून झालेल्या अपघातानंतर जिल्ह्यातील शाळांचा सर्व्हे केला गेला. त्यात येथील शाळा धोकादायक असल्याचा अहवाल दिला गेला आणि शाळेतील खोल्या जमिनदोस्त करण्यात आल्या. शाळा पाडण्याची तत्परता दाखवणाऱ्या जिल्हा परिषदेने पुन्हा बांधण्याची मात्र घाई केली नाही. त्यामुळे आज या चिमुकल्यांना झाडाखाली किंवा गावातील मंदिरात शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या या शाळेत पाच शिक्षक आहेत. शिक्षकांना शिकवण्याबरोबरच मुलांच्या सुरक्षेचीही काळजी घ्यावी लागते. जिल्हा परिषदेने लवकरात लवकर रखडलेले हे काम पूर्ण करण्याची गरज आहे. सर्व शिक्षा अभियान आज सरकार राबवत असताना जिल्हा परिषद शाळांची जर अशी अवस्था असेल, तर कोणते पालक आपल्या पाल्यांना अशा शाळांमध्ये प्रवेश देतील? सरकार आणि प्रशासनाच्या अशाच अनास्थेमुळे साहजिकच खाजगी शिक्षणसंस्थेकडे पालकांचा कल वाढताना दिसतो.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Ahmednagar News, Education

पुढील बातम्या