अहमदनगरमधील नगरसेवक मृत्यू प्रकरणात पोलीसच अडचणीत, 16 जणांना नोटिसा

अहमदनगरमधील नगरसेवक मृत्यू प्रकरणात पोलीसच अडचणीत, 16 जणांना नोटिसा

दिवंगत माजी नगरसेवक कैलास गिरवले यांचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता.

  • Share this:

अहमदनगर, 20 फेब्रुवारी : नगरसेवक कैलास गिरवले यांच्या मृत्यूप्रकरणी कोर्टाने स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) 16 जणांना औरंगाबाद खंडपीठाने नोटिसा बाजवल्या आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 मार्चला होणार आहे. दिवंगत माजी नगरसेवक कैलास गिरवले यांचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता.

या प्रकरणी सखोल तपास व्हावा व संबंधित दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी त्यांच्या पत्नी निर्मला कैलास गिरवले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या क्रिमीनल रिट पिटीशन दाखल केले आहे. न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती एम. जी. शेवाळकर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होऊन न्यायालयाने संबंधित प्रकरणातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नगरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह 16 पोलीस कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे सादर करण्यासंदर्भात नोटिसा जारी केल्या आहेत.

राज्य गुन्हे अन्वेषण ( सीआयडी ) आजपर्यंत काय तपास केला, याबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिले असून पुढील सुनावणी 27 मार्चला होणार आहे. या सुनावणीच्या तारखेपर्यंत सीआयडीने आपला अहवाल सादर करावयाचा आहे. रिट पिटीशनर निर्मला गिरवले यांच्यातर्फे अॅड. नितीन गवारे पाटील यांनी बाजू मांडली.

पोलिसांच्या मारहाणीतच कैलास गिरवले यांचा मृत्यू झाला, अशा आशयाची तक्रार त्यांच्या पत्नी निर्मला गिरवले यांनी आपल्या याचिकेत केलेली असून त्यासंदर्भात संबंधितांवर कारवाईची मागणी केलेली आहे. आज न्यायालयाने संबंधित प्रकरणात वरील आदेश केला असल्याची माहिती अ‍ॅड गवारे यांनी दिली.

या पोलिसांना नोटिसा :

पोलीस निरीक्षक दिलीप पवार

श्रीधर घुट्टे

रविंद्र कर्डिले

मंजूर सय्यद

विजय ठोंबरे,

दत्तात्रय गव्हाणे

दत्तात्रय हिंगडे

दिंगबर कारखिले

भाऊसाहेब काळे

किरण जाधव

संदीप घोडके

मल्लिकार्जुन बनकर

योगेश गोसावी

मनोहर गोसावी

सचिन अडबल

विजयकुमार वेठेकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2020 10:41 PM IST

ताज्या बातम्या