मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला नगरकरांनी रस्त्यावरच धु-धु धुतला

मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला नगरकरांनी रस्त्यावरच धु-धु धुतला

संतापलेल्या नागरिकांनी संबंधित तरुणाला चांगलाच चोप दिला.

  • Share this:

साहेबराव कोकणे, अहमदनगर, 9 फेब्रुवारी : मुलीची छेड काढणाऱ्याला रोडरोमिओची नगरकरांनी रस्त्यावरच धुलाई केली आहे. अल्पवयीन मुलीला छेडछाड केल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला. त्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी संबंधित तरुणाला चांगलाच चोप दिला.

अहमदनगर शहरात एक अल्पवयीन मुलगी कॉलेजला जात असताना हा रोमिओ नेहमी तिची छेड काढायचा. आजही हा रोमिओ छेड काढत होता. अल्पवयीन मुलगी रस्त्याने जात असताना तिच्या दिशेने चिठ्ठी फेकणे, इशारे करणे असे प्रकार हा रोमिओ करायचा.

पाठलाग करण्यासारखेही प्रकार होत होते. आजही हा रोमिओ मुलीचा पाठलाग करत होता. या प्रकारामुळे भेदरलेल्या मुलीने आरडाओरडा केला. त्यावेळेस तिच्या मदतीला आजुबाजूचे नागरिक धावून आले आणि रोमिओला चांगलाच चोप दिला. स्थानिक नागरिकांनी या रोमिओला पोलिसांच्या ताब्यात दिले.

Facebook वर लहान मुलांचे अश्लील फोटो टाकणाऱ्या 17 जणांवर मुंबईत कारवाई

पोलिसांनी मुलीसोबत छेडछाड करणाऱ्या रोमिओला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. ताब्यात घेतलेला रोमिओ हा नशेत असल्याचे पुढे येत आहे. राज्यात मुलींच्या आणि महिलांच्या छेडछाडीच्या प्रकारात वाढ झाली आहे. या प्रकारांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

First published: February 9, 2020, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading