अहमदनगरमध्ये तब्बल 22 लाखांची तूर जप्त,तूर रॅकेटचा संशय

अहमदनगरमध्ये तब्बल 22 लाखांची तूर जप्त,तूर रॅकेटचा संशय

पाथर्डी मार्केट यार्ड आणि व्यापाऱ्यांच्या संगनमतानं हमी भावात तूर विक्रीचा डाव होता

  • Share this:

03 मे : अहमदनगरला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने साधारण बावीस लाखांच्या तुरीच्या दोन ट्रक ताब्यात घेतले आहेत. पाथर्डी मार्केट यार्ड आणि व्यापाऱ्यांच्या संगनमतानं हमी भावात तूर विक्रीचा डाव होता.

मार्केट यार्डनं व्यापाऱ्यांना सरकारी बारदान्याचा पुरवठा केला होता. तर व्यापाऱ्यांनी दीड ते दोन हजार दरानं तूर खरेदी केली होती. हीच तूर सरकारी बारदान्यात भरुन हमी भावानं भोसरीला वखार महामंडळाच्या गोडाऊन पाठवली जात होती.

मात्र मार्केट यार्डनं चालकांना बनावट सह्यांचं पोहच पावती दिली होती. पावतीवर चुकीचा गाडी क्रमांक नोंदवलाय.  गाडीत 21 टन तूर असताना पावतीवर केवळ २१ क्विंटल दाखवली आहे.

त्याचबरोबर भोसरीच्या वखार मंडळाला २८ तारखेला २८ टन तूर पाठवल्या असल्याचा आरोप होतोय. या तूर रॅकेटमध्ये विद्यमान चेअरमन, संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांच्या हात असल्याचा आरोप ट्रक मालकानं केलाय. त्याचबरोबर या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

First published: May 3, 2017, 4:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading