अहमदनगर जिल्ह्याचे लवकरच विभाजन होणार; राम शिंदेंचा दावा

अहमदनगर जिल्ह्याचे लवकरच विभाजन होणार; राम शिंदेंचा दावा

क्षेत्रफळाने राज्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे लवकरच विभाजन होणार असल्याचे संकेत अहमदनगर पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले आहेत.

  • Share this:

29 जानेवारी : क्षेत्रफळाने राज्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे लवकरच विभाजन होणार असल्याचे संकेत अहमदनगर पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले आहेत. जिल्ह्याच्या विभाजनाची लोकांची मागणी लवकरच राज्यसरकार पूर्ण करणार असल्याचा दावाही राम शिंदे यांनी केला. क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या नगर जिल्ह्याचे दोन भागात विभाजन होणार आहे. नगर दक्षिण आणी उत्तर अशा दोन भागात जिल्ह्याचे विभाजन व्हावं ही अनेक वर्षापासून लोकांची मागणी आहे आणी सध्या प्रशासनालाही एवढ्या मोठ्या जिल्ह्यात सुविधा देण्यास अडचणी येताहेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्याचे विभाजन होणार असल्याचा दावा राम शिंदे यांनी शिर्डीत असताना केला आहे.

दरम्यान पोलीस हेरगिरी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. मात्र त्यांच्या आरोपात काही तथ्य नसल्याच गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं असून विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रकार परिषदेत पोलिसांचे जाणे म्हणजे त्यांचा कामाचा भाग असल्याच म्हणत गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी पोलिसांचे समर्थन केले आहे.

साडे तीन वर्षांपूर्वी शिवसेना विरोधी पक्षात होती ते सत्तेत कधी आले हे त्यांना कळलंच नाही. त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असून जे येतील त्यांना सोबत घेऊन जे येणार नाही त्यांना सोडून भाजपा 2019ला पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा दावा मंत्री राम शिंदे यांनी केला आहे. पण या सगळ्या राजकीय वादातून अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणार का? याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे.

First published: January 29, 2018, 9:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading