राष्ट्रवादीतील मतभेद उघड, पक्षाचा आदेश झुगारून नगरमध्ये भाजपला मदत

राष्ट्रवादीतील मतभेद उघड, पक्षाचा आदेश झुगारून नगरमध्ये भाजपला मदत

'या निवडणुकीत भाजपला मदत न करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्थानिक नेत्यांना दिले होते'

  • Share this:

अहमदनगर, 28 डिसेंबर : अहमदनगर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत सर्वांना धक्का देत भाजपने बाजी मारली आहे. पण भाजपच्या या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कारण पक्षनेतृत्वाचा विरोध असतानाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी महापौर निवडणुकीत भाजपला साथ दिली आहे.

'या निवडणुकीत भाजपला मदत न करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्थानिक नेत्यांना दिले होते,' अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी 'न्यूज 18 लोकमत'शी बोलताना दिली आहे. त्यामुळे पक्षाच्या आदेशाच्या विरोधात जात नगरमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला मदत केल्याचं उघड आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या मदतीमुळेच भाजपचा महापौर होऊ शकला आहे.

अहमनगरच्या महापौरपदाचा फैसला काही वेळापूर्वीच झाला. या निवडणुकांमध्ये भाजपने शिवसेनेला धोबीपछाड केलं आहे. भाजपचे बाबासाहेब वाकळेच महापौर होणार असल्याचं काही प्रमाणात निश्चित झालं आहे.

शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असला तरी इतर सर्वपक्षीयांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यात राष्ट्रवादीच्या संपत बरस्कार यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे गिरीश महाजन यांची खेळी यशस्वी झाली आहे.

उत्तर महाराष्ट्रात भाजपाने जोरदार मुसंडी मारली. धुळे जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी महाजनांवर होती. भाजपने धुळ्यातली निवडणूक एकहाती जिंकली. मात्र, नगरमध्ये जबाबदारी नसल्यानं तिथे भाजप पिछाडीवर पडली होती. अखेर पक्षानं गिरीश महाजन यांच्यावर महापौर निवडणुकीची जबाबदारी दिली. महाजन यांनी ही चोख पार पाडली आहे.

10 डिसेंबर रोजी अहमदनगर महापालिका निवडणुकांची मतमोजणी झाली. 68 जागांपैकी शिवसेना-24, राष्ट्रवादी-18, भाजप-14 असं या निवडणुकीत संख्याबळ राहिलं. त्यामुळे 35 जागांचा बहुमताचा आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आला नाही. असं असतानाही महापौरपदाच्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपनंही बाजी मारली आहे.

Special Report : निवडणुकीच्या वर्षात बायोपिकवरून मतांवर डोळा?

First published: December 28, 2018, 12:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading