नामर्दाच्या अवलादांना ठेचून काढू, शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

नामर्दाच्या अवलादांना ठेचून काढू, शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

कायदा सुव्यवस्थेची हत्या झाली असून, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्र्यांची गरज असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय.

  • Share this:

अहमदनगर, 25 एप्रिल : नामर्दाच्या अवलादांना ठेचून काढू अशा संतप्त शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केडगाव दुहेरी हत्याकांडवर प्रतिक्रिया दिली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अहमदनगरच्या दौऱ्यावर आहे. आज केडगावमध्ये हत्या करण्यात आलेले शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांना भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं. या दोन्ही कुटुंबाची जबाबदारी शिवसेना उचलणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसंच दोन्ही कुटुंबियांना साडे पंधरा लाखाची आर्थिक मदतही करण्यात आलीय.

दरम्यान, अहमदनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. कायदा सुव्यवस्थेची हत्या झाली असून, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्र्यांची गरज असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय.

First published: April 25, 2018, 7:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading