यंदाही भगवानगडावर राजकीय प्रवेशाचा ड्रामा, नामदेवशास्त्रींनी थोपटले दंड

यंदाही भगवानगडावर राजकीय प्रवेशाचा ड्रामा, नामदेवशास्त्रींनी थोपटले दंड

भगवानगडावर दसऱ्याला कोणताही राजकीय किंवा सामाजिक मेळावा घेऊ देऊ नका, अशी मागणी महंत नामदेवशास्त्रींनी केली आहे.

  • Share this:

12 सप्टेंबर : अहमदनगरच्या भगवानगडाचा वाद या वर्षी पुन्हा होणार अशी चिन्हं आहेत. भगवानगडावर दसऱ्याला कोणताही राजकीय किंवा सामाजिक मेळावा घेऊ देऊ नका, अशी मागणी महंत नामदेवशास्त्रींनी केली आहे.

दरवर्षी भगवानगडावर दसरा मेळावा आयोजित केला जातो. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे दरवर्षी भगवानगडावर दसरा मेळावा आयोजित करत असतात. मागील वर्षी दसरा मेळाव्यावरून नामदेवशास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला होता. एकमेकांना धमकी देणाऱ्या व्हिडिओ आणि आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. या वादानंतर पंकजा मुंडेंना गडाच्या पायथ्याशी सभा घ्यावी लागली होती.

आता याही वर्षी गडावर राजकीय पक्षांना प्रवेश नाकारण्याचा ड्रामा सुरू होणार अशी चिन्ह आहे. महंत नामदेवशास्त्रींनी भगवानगडाच्या वर्धापनदिनी दसऱ्याच्या दिवशी राजकीय, सामाजिक मेळावा आणि सभा,कोणत्याही प्रकारचे उद्घाटन समारंभ घेण्यास भगवानगडावर परवानगी देऊ नये, गडाच्या महंता बरोबर गडाला पोलीस बंदोबस्त मिळवा अशी मागणी निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. हेच निवेदन त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयातही पाठवलंय.

त्यामुळे आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध महंत नामदेव शास्त्री असा वाद पेटणार याची चिन्हं दिसत आहे.

First published: September 12, 2017, 5:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading