मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कृषीमंत्री दादा भुसेंनी काढली गायीची धार, VIDEO व्हायरल

कृषीमंत्री दादा भुसेंनी काढली गायीची धार, VIDEO व्हायरल

  खाजगी दौऱ्यावर जात असताना  दादा भुसे यांनी सटाणा भागात असलेल्या गीर गाय संवर्धन केंद्राला भेट दिली.

खाजगी दौऱ्यावर जात असताना दादा भुसे यांनी सटाणा भागात असलेल्या गीर गाय संवर्धन केंद्राला भेट दिली.

खाजगी दौऱ्यावर जात असताना दादा भुसे यांनी सटाणा भागात असलेल्या गीर गाय संवर्धन केंद्राला भेट दिली.

सटाणा, 27 नोव्हेंबर : राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आज नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात एका गीर गाय संवर्धन केंद्राला भेट दिली. त्यावेळी दादा भुसे यांचे शेतकरी रूप पाहण्यास मिळाले. दादा भुसे यांनी चक्क गायीचे दूध काढले. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे कधी शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत नांगरणी, पेरणी करतात तर कधी शेतात जाऊन स्वतः पिकांना पाणी देतात. आता त्यांचे आणखी एक नवे रूप समोर आले आहे.

खाजगी दौऱ्यावर जात असताना त्यांनी सटाणा भागात असलेल्या गीर गाय संवर्धन केंद्राला भेट दिली.  गीर गाय संवर्धन केंद्र कसे आहे, हे पाहण्यासाठी ते इथं आले होते. केंद्राची पाहणी केली आणि गायींबद्दल माहिती जाणून घेतली.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, बंडखोर नेत्याची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी

भुसे यांनी केवळ भेटच दिली नाही तर गायीची पाहणी केल्यानंतर एका गायीच्या दुधाची धार काढली. दादा भुसे यांचे हे रूप पाहून उपस्थित शेतकऱ्यांना सुखद धक्का बसला. गायीचे दूध काढतानांचा दादा भुसे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो चर्चेचा विषय ठरत आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिल्लीत केले स्थानबद्ध

दरम्यान,  शेती सुधारणा कायद्याविरोधात शेतकरी संघटनांकडून दिल्ली घेराव आंदोलन पुकारण्यात आलं आहे. आंदोलनात 500 हून अधिक शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. परंतु, आंदोलनापूर्वीच महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनासह शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे.

मुलांसोबत लोकलने प्रवास करण्यास महिलांना मनाई, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

मजनूका टिला येथील गुरुद्वारातून राष्ट्रीय किसान मोर्चाचे समन्वयक संदीप आबा गिड्डे-पाटील तसेच राष्ट्रीय किसान महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शंकर दरेकर यांना गुरुवारी ताब्यात घेण्यात आलं. त्यांना सराय काले खॉं परिसरात स्थानबद्ध ठेवण्यात आले आहे. नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड, जळगाव येथील चारशे शेतकऱ्यांचा जत्था सचखंड एक्स्प्रेसनं बुधवारीच दिल्लीत दाखल झाला आहे. या शेतकऱ्यांची राहण्याची व्यवस्था मजनू का टीला गुरूद्वारा, काश्मिरी गेट येथे करण्यात आली आहे.

पंरतु, दिल्ली पोलिसांनी सकाळीच सर्व शेतकरी आंदोलकांना गुरूद्वारात स्थानबद्ध केले. शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गेले असताना पोलिसांनी शेतकरी नेत्यांनाही ताब्यात घेतले.

First published: