Home /News /maharashtra /

बच्चू कडूंच्या आरोपानंतर महाविकास आघाडीत खळबळ, अखेर कृषी मंत्र्यांनी केला खुलासा

बच्चू कडूंच्या आरोपानंतर महाविकास आघाडीत खळबळ, अखेर कृषी मंत्र्यांनी केला खुलासा

बच्चू कडूंच्या या आक्रमक पवित्र्यानंतर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी खुलासा केला आहे.

अमरावती, 23 ऑगस्ट : 'शेतकऱ्यांच्या संदर्भात कृषी विभाग गंभीर नाही. राज्यातील कृषी खाते झोपलं आहे का? असा घरचा अहेर देत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारवर 'प्रहार' केला होता. बच्चू कडूंच्या या आक्रमक पवित्र्यानंतर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी खुलासा केला आहे. 'कृषी विभाग हे शेतकऱ्यांच्या प्रति गंभीर नाही, अशी कोणतीही परिस्थिती नाही. ज्या गोष्टी गोष्टी समोर येत असतात त्याचा निपटारा करण्याचे काम हे कृषी विभागाकडून केले जात आहे' असं दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे. तसंच, 'राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या काही ज्या सूचना आहे. त्यांचा विचार केला जाईल. बच्चू कडू यांनी  जे आरोप केले त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल', असंही भुसे यांनी स्पष्ट केले. परंतु, बच्चू कडू यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिल्यांदाच दोन मंत्री आमनेसामने आल्याचे पाहण्यास मिळाले. काय म्हणाले होते बच्चू कडू? 'ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. त्याची लगेच पाहणी करून पंचनामे केले जाणार आहे. पंचनामे केल्यानंतर तातडीने मदत दिली जाणार आहे. यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे. जे पेरले ते उगावले नाही आणि हातात जी पिकं हातात आली, ती मेलेली होती, त्यामुळे राज्य सरकारमधील कृषी खाते हे झोपलेले आहे का? असा सवाल  बच्चू कडूंनी उपस्थितीत केला होता. 'जेव्हा बियाणे तयार होते तेव्हा त्यात काही बदल केले जातात की काय असा संशय आहे. सरकारच्या महाबीज कंपनीने 2 ते 3 हजार रुपयात बाजारातीलच  निकृष्ट दर्जाचं बियाणे घेऊन शेतकऱ्यांना 8 हजार रुपये भावानं विकले असावे', असा आरोपही बच्चू कडू यांनी केला होता. तुकाराम मुंढेंचा आदेश मोडीत, राज्य सरकारने दिला नागपूरकारांना मोठा दिलासा तसंच, 'गेल्या 50 वर्षांपासून हेच सुरू आहे. त्यामुळे बोगस  बियाणे बनवणाऱ्या कंपनीच्या मालकांनाच चोपल पाहिजे' असे म्हणत बच्चू कडूंनी आपल्या स्टाईलने कंपन्यांना इशारा दिला.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Shivsena, बच्चू कडू

पुढील बातम्या