मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भविष्यात ठाकरे सरकार नक्कीच येईल, पण...; सत्तारांचं राऊतांना नवं चॅलेंज

भविष्यात ठाकरे सरकार नक्कीच येईल, पण...; सत्तारांचं राऊतांना नवं चॅलेंज

अब्दुल सत्तारांची पुन्हा संजय राऊतांवर टीका

अब्दुल सत्तारांची पुन्हा संजय राऊतांवर टीका

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते नंदूरबारमध्ये बोलत होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nandurbar, India

नंदूरबार, 22 मार्च : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते नंदूरबारमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत कधी खरं बोलतात का? जे आमच्या मतांवर निवडून गेले तेच आमच्यावर बोलत असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे.  ज्यांचं मीठ खाल्लं आहे, त्याचं तरी बोलताना राऊतांनी भान ठेवावं असंही सत्तार यावेळी म्हणाले.

सत्तार यांनी नेमकं काय म्हटलं?

अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत कधी खरं बोलतात का? जे आमच्या मतावर निवडून गेले ते आमच्यावरच बोलत आहेत. त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी दादा भुसेंचं आव्हान स्विकारून राजीनामा द्यावा, आणि परत निवडून येऊन दाखवावं. राऊत परत निवडून आले तर भविष्यात त्यांचं सरकार नक्कीच येईल. पण ते जर निवडून आले नाहीत तर त्यांचे नातू सुद्धा सरकारमध्ये नसतील असा खोचक टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे.

...तर राज ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 

पुढे बोलताना अब्दुल सत्तार यांनी म्हटलं की, दादा भुसे यांच्या बोलण्यामुळे राऊतांना मिर्ची लागली आहे. संजय राऊत यांच्याकडे आता फक्त मोजके आमदार उरले आहेत. ज्यांचं मीठ खाल्लं आहे, त्याचं तरी बोलताना राऊतांनी भान ठेवावं असं सत्तार यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos