राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाण्याआधी आमदार पिचड यांना मतदारसंघातच धक्का

राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेशाच्या वाटेवर असलेल्या वैभव पिचड यांना धक्का बसला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2019 03:15 PM IST

राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाण्याआधी आमदार पिचड यांना मतदारसंघातच धक्का

अहमदनगर, 30 जुलै : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी बांधवांनी आमदार वैभव पिचड यांच्याविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला आहे. पिचड यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेशाच्या वाटेवर असलेल्या वैभव पिचड यांना धक्का बसला आहे.

आदिवासी नेते अशोक भांगरे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी अकोले इथं मोर्चा काढला. पिचड यांच्यावर आदिसवासींनी जमीन बळकावण्याचा आरोप केला आहे.  या जनआक्रोश मोर्चात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव सहभागी झाले होते. त्यामुळे वैभव पिचड यांची डोकेदुखी वाढली आहे.

वैभव पिचड यांनी नुकतीत भाजपत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. अकोले येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर आज त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामाही सुपुर्द केला आहे.

दरम्यान, पिचड पिता-पुत्राच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडले आहे. तर कार्यकर्त्यांनीही पिचडांसोबत भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगितले आहे.

'शरद पवारांची साथ सोडताना दु:ख होत आहे'

Loading...

भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्यानंतर मधुकर पिचड यांनी शरद पवारांबाबतही भाष्य केलं होतं. माझा कोणावरही राग नसून शरद पवारांची साथ सोडताना दु:ख होत असल्याची प्रतिक्रिया मधुकर पिचड यांनी दिली. 'शरद पवारांना सोडून जाण्याचे दु:ख आहे. मात्र मतदार संघातील सामान्य जनता तसेच आदिवासी समाजाच्या विकासासाठी जाणीवपूर्वक निर्णय घ्यावा लागत आहे,' असं पिचड यांनी सांगितलं.

VIDEO: 'कोणा गणेशच्या जाण्याने पक्ष संपत नसतो', आव्हाडांची नाईकांवर जहरी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 03:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...