तिहेरी हत्याकांडाने बीड पुन्हा हादरलं, आईसह दोन मुलांची निर्घृण हत्या

तिहेरी हत्याकांडाने बीड पुन्हा हादरलं, आईसह दोन मुलांची निर्घृण हत्या

बीड शहरातील पेठ बीड भागात आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास एकाच घरात तिघांचे मृतदेह आढळून आले.

  • Share this:

बीड, 24 मे :  बीडमध्ये एकाच कुटुंबातील शेतीच्या वादातून तिघांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी एका तिहेरी हत्याकांडाने बीड हादरलं.  आई आणि दोन मुलांची राहत्या घरात निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बीड शहरातील पेठ बीड भागात आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास एकाच घरात तिघांचे मृतदेह आढळून आले. संगीता संतोष कोकणे ( वय 31 ), संदेश संतोष कोकणे ( अंदाजे वय 10 ) या दोन्ही मायलेकाचे मृतदेह एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले आहे. तर मयूर संतोष कोकणे (वय 7) याचा मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये आढळून आला आहे.  आई आणि मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. तर लहान मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -इंटरनेट रिचार्ज करण्यासाठी आईनं दिला नकार, मलानं उचललं टोकाचं पाऊल

घटनेची माहिती मिळताच  पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु, ही घटना कौटुंबिक वादातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मयत महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह घरात आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या झाल्याची घटना बीडमध्ये घडली होती.  ही घटना केज तालुक्यातील मांगवडगाव येथे घडली होती. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते.

हेही वाचा - मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितली कोरोनाची नवी लक्षणं

संपादन - सचिन साळवे

First Published: May 24, 2020 04:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading