कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा झीज

कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा झीज

त्यामुळे 2 वर्षांपूर्वी मूर्तीवर केलेली रासायनिक संवर्धन प्रक्रिया कुचकामी ठरली काय असा सवाल आता भक्तांमधून विचारला जातोय.

  • Share this:

संदीप राजगोळकर, 28 मे : करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची आता पुन्हा झीज सुरू झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे 2 वर्षांपूर्वी मूर्तीवर केलेली रासायनिक संवर्धन प्रक्रिया कुचकामी ठरली काय असा सवाल आता भक्तांमधून विचारला जातोय.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातली देवीची मूर्ती ही 2 हजार वर्षांपूर्वीची आहे अशी आख्यायिका आहे. त्यामुळं मूर्तीची झिज झाल्यानंतर पुरातत्व खाते आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं 2015 साली मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पुढच्या 100 वर्षात मूर्तीला काही होणार नाही असा दावाही करण्यात आला होता. पण आता या मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागले आहेत आणि रासायनिक थरही निघत आहे. देवीच्या मूर्तीच्या पायाचा भाग आणि गदेचे टोकही झिजल्याचं दिसून येतंय. त्यामुळं संवर्धन प्रक्रियेबद्दल आता चर्चा सुरु झालीय.

देवीच्या गाभाऱ्यातली आद्रता कमी करण्यासाठी देवस्थान समिती प्रयत्न सुरु असल्याचं सांगत असली तरी दिवसेंदिवस भक्तांची वाढती गर्दी आणि गाभाऱ्यातील तपमानामुळेच मूर्तीची झीज होत आहे. त्यामुळे आता याबाबत देवस्थान समिती काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे.

एक नजर टाकूयात मंदिरातल्या या सगळ्या गोष्टींवर

- 22 जुलै ते 6 ऑगस्ट 2015 या काळात मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया.

- पुरातत्त्व विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून प्रक्रिया

- गाभाऱ्यातील तपमान कमी करण्यासाठी तिथे निर्माल्य आणि फुलांचा वापर टाळला पाहिजे.

- पूजेसाठी गायीच्याच दुधाचा वापर केला पाहिजे.

- देवीच्या दागिन्यांची संख्या कमी केली पाहिजेत.

- आर्द्रता कमी करण्यासाठी गर्भकुंडीतील पाण्याचा साठा कमी केला पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2017 03:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading